Mumbai Police On Elon Musk Tweet:  एलन मस्क यांचे ट्विट मुंबई पोलिसांकडून मजेशीरपणे रिट्विट,  म्हणाले  'सिग्नल वापरा पण रस्त्यावरचे'
Mumbai Police On Elon Musk Tweet | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा बहुमान काही काळ मिळवलेले उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी( Mumbai Police) अत्यंत मजेशीर अंदाजात घेत सामाजिक संदेशाची जोड दिली आहे. सोशल मीडिया अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या धोरणात बदल केले. या बदलत्या धोरणामुळे युजर्सची सर्व माहिती व्हॉट्सअॅपकडे जाणार आहे. याविरोधात जगभरातील युजर्समध्ये असंतोष आहे. अशातच सिग्नल नावाचे मोबाईल अॅप लोकप्रिय झाले असून, बहुसंख्येने ते डाऊनलोडही झाले आहे. एलन मस्क यांनी याबाबतच ट्विट केले आहे.

दरम्यान, एलन मास्क यांनीही हाच धागा पकडत यूज सिग्नल (Use Signal) असे ट्विट केले आहे. अर्थात एलन मास्क यांनी फक्त Use Signal इतकेच ट्विट केले आहे. यावर मुंबई पोलिसांनी त्यांना सोईस्कर असा अर्थ काढत रिट्विट (Mumbai Police retweets Elon Musk tweet) केले आहे. एलन मास्क यांच्या ट्विटला मुबई पोलिसांनी रस्ते सुरक्षेची जोड देत सामाजिक संदेश दिला आहे. त्यामुळे एलन मास्क आणि मुंबई पोलिस यांच्यात एक छान संवादच तयार झाला आहे.

Elon Musk: Use Signal

Mumbai Police: Especially the ones on the streets.

कोण आहेत एलन मस्क

एलन मस्क हे एक दक्षिण अफ्रिकी, कॅनेडीयन, अमेरिकी व्यापारी, उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. ते स्पेसएक्स संस्थेचे संस्थापक आहेत. सीईओ आणि मुख्य डिझायनर असे त्यांच्या कामाचे स्वरुप आहे. ते टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक आहेत. विविध संस्थांचे संस्थापक, मालक आणि सल्लागार, सीईओ अशा विविध भूमिकांमध्ये ते कार्यरत असतात. नुकताच त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये समावेश झाला होता. (हेही वाचा, Mumbai: अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव)

व्हट्सअॅप धोरण

व्हाट्सअॅपकडून नुकतेच त्यांचे खासगी आणि माहितीच्या संग्रहीकरणाबाबत स्पष्टीकरण पुढे आले होते. त्यानुसार व्हाट्सअॅप आता युजर्सच्या चॅट, फोटो, व्हिडिओ, फोनकॉल, आणि इतर माहितींवर लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले होते. त्यावर जगभरात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, व्हाट्सअॅपने लागलीच खुलासा केला असून, युजर्सचे कोणत्याही प्रकारचे खासगी मेसेज अथवा इतर कोणत्याही माहिती लिक होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे म्हटले आहे. व्हाट्सअॅपच्या नव्या पॉलिसी धोरणाबाबत चर्चा होत असतानाच गुगल सर्च इंजिनवर काही माहीती लिक झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यावर व्हॉट्सअॅपने खुलासा केला आहे.