व्हॉट्सअॅपमध्ये मागील काही दिवसांत अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. युजर्ससाठी व्हॉट्स अॅप वापरणं अधिक सुकर व्हावे याकरिता यामध्ये सातत्याने नवनवे फीचर्स जोडण्यात आले आहेत. आता जिफ, स्टिकर्सदेखील व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिले आहेत. लवकरच व्हॉट्सअॅपवर स्टेटसमध्ये आता अॅड्स (जाहिराती) दिसणार आहेत.
सध्या व्हॉट्सअॅपवर दिसणार्या अॅड्स आणि मॉनिटायझेशनची प्रक्रिया सुरू आहे. यामधून व्हॉट्सअॅप कमाई करू शकणार आहे. साधारणपणे व्हॉट्सअॅपवर स्टेट्स शेअर केल्यानंतर ते 24 तास लाईव्ह असते. यादरम्यानचं युजर्सना जाहिराती दिसणार आहेत. मात्र व्हॉट्सअॅप ही सुविधा कधीपासून लागू करणार याबबातचा खुलासा करण्यात आलेला नाही. आयओएस आणि अॅन्ड्रॉईड अशा दोन्ही स्वरूपाच्या स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
युट्युब, फेसबूकवरही व्हिडिओदरम्यान जाहिराती दिसतात. या जाहिराती काही अंशी टाळण्याची सोय देण्यात आली आहे. आता व्हॉट्सअॅपवरही जाहिरात दिसू लागल्यानंतर त्या टाळण्यासाठी सेटिंगमध्ये खास बदल करण्यात आले आहेत.
व्हॉट्सअॅपवर स्टेटसमध्ये जाहिरात टाळण्यासाठी -
व्हॉट्सअॅपवर सेटिंगमध्ये विशिष्ट ब्रॅन्ड म्यूट करण्याची सोय दिली जाणार आहे. सोबतच स्टेटस टॅबवरही जाहिरात म्यूट करण्याचा पर्याय आहे.