WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्स अॅप (Whats App) हे जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारं सोशल मिडीया (Social Media) अॅप आहे. व्हॉट्स अॅप आपल्या वापर्कत्यांसाठी नेहमीच नवनवीन अपडेट (Whats App Update) घेवून येताना दिसतो. आता व्हॉट्सअप लवकरच पाच नवीन अपडेट लॉंच (Launch) करणार आहेत. तरी ते अपडेप नेमके कुठले, कोणते आणि तुम्हाला कसे वापरता येणार याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तरी तुम्ही व्हॉट्सअप वापरकर्ते असाल आणि तुम्हाला हे व्हॉट्सअपचे हे नवे अपडेट्स जाणून घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. WhatsApp चे जगभरात करोडो वापरकर्ते आहेत. इन्स्टंट मेसेजिंग (Instant Messaging) वापरकर्त्यांना चांगला चॅट (Chat) अनुभव देण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट्स व्हॉट्स अॅप घेवून आला आहे. व्हॉट्सअॅप लवकरच वेब आणि मोबाइल वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्सवर घेवून येत आहे.

 

चॅट विथ युवरसेल्फ (Chat with yourself)

चॅट विथ युवरसेल्फ या नव्या व्हॉट्स अप अपडेच्या माध्यमातून WhatsApp वापरकर्ते लवकरच स्वतःशी चॅट करू शकणार आहे. तुमच्या व्हॉट्स अप चॅट विंडोमध्ये “स्वतःला संदेश द्या” असे कॅप्शन दिलेले असेल. तरी या फिचरच्या माध्यमातून तुम्ही स्वताला सहज मेसेज पाठवू शकणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हा स्वतला कुठला मेसेज पाठवायचा असल्यास, कुणाला पाठवलेला मेसेज सेव्ह करायचा असल्यास किंवा काही महत्वाचे कागदपत्र नोंद असावी म्हणून स्वतला पाठवून ठेवल्यास हे नवं फिचर तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

 

ग्रुप चॅटमध्ये प्रोफाइल फोटो (Group Chat Profile Photo)

व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटबाबतीत एका नवीन फीचर घेवून येणार आहे.ज्यानुसार ग्रुपमध्ये कुणीही मेसेज पाठवला तरी त्या मेसेजवर त्याच्या कॉंटॅक्ट डिटेलसह फोटोही दिसणार आहे. या नव्या फिचरसह व्हॉट्सअप वापरकर्त्यांना ग्रुप चॅटमध्ये वैयक्तिक संपर्कांसाठी प्रोफाइल फोटो सेट करता येईल. ग्रुपमध्ये मेसेज आल्यावर सदस्यांचा प्रोफाइल फोटो दिसेल. सदस्याकडे प्रोफाइल चित्र नसल्यास किंवा काही कारणास्तव ते उपलब्ध नसल्यास चॅटमध्ये डीफॉल्ट प्रोफाइल चिन्ह प्रदर्शित केले जाईल.

 

कॅप्शनसह मीडिया फॉरवर्ड फिचर (Caption Media Forward Feature)

व्हॉट्सअॅप वापरकर्ते लवकरच फोटो, व्हिडिओ, GIF आणि दस्तऐवज पाठवताना तो कॅप्शनसह फॉरवर्ड करता येणार आहे. तरी तुम्ही पाठलेला डाटाला कॅप्शनसह पाठवल्याने ज्याला तुम्ही मेसेज पाठवला किंवा तुम्हालाही हा ऑप्शन अधिक सेयिस्कर असणार आहे.

 

नवीन ब्लर टूल (Blur Tool)

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप बीटा टेस्टर्स आता अॅपवरील इमेज सहज ब्लर करता येणार आहे. या नव्या फिचरसह वापरकर्ते त्यांच्या प्रतिमांमधील संवेदनशील माहितीची हाईड करू शकतात. व्हॉट्सअॅपने दोन ब्लर टूल्स तयार केले आहेत जे वापरकर्त्यांना पर्यायी ब्लर इफेक्ट वापरून त्यांच्या फोटो सेव्ह करण्यास परवानगी देते. तरी या नव्या ब्लर ऑप्शनसह तुम्ही पाठवत असलेला कुठलाही फोटो सहज ब्लर करणं सक्य होणार आहे.

 

डेस्कटॉपवर मीडिया ऑटो-डाउनलोड (Desktop Media Auto Download)

Windows आणि macOS WhatsApp डेस्कटॉप दोन्ही वापरकर्ते आता फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवजांसाठी आपल्या आवश्यकतेनुसार डाउनलोड सेटिंग्ज करता येणार आहे तरी हे फिचर सध्या फक्त बीटा डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.