व्हॉट्स अॅप (Whats App) कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेवून येताना दिसतो. व्हॉट्समध्ये आता नव्याने येणार असणारी अपडेट तर भन्नाट आहे. व्हॉट्स अॅप युजर (Whats App User) या नव्या फिचरला मोठी पसंती दाखवत आहे. व्हॉट्स अॅप कम्युनिटी (Whats App Community) हे नवं फिचर व्हॉट्स अपकडून लॉंच (Launch) करण्यात आलं आहे. WhatsApp Communities फीचर्स द्वारे आता तुम्हाला इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबूप्रमाणे (Facebook) पोल करता येणार आहे. तसेच या नव्या अपडेटनुसार (Update) तुम्ही एकाच व्हिडीओ कॉलवर ३२ लोकांना सहभागी करता येणार आहे. पण व्हॉट्स अॅप कम्य़ुनिटी फीचर लाँच झाल्यानंतर वापरकर्त्यांनी नवीन फीचरची तुलना व्हॉट्स अप ग्रुपशी करण्यास सुरुवात केली. एवढचं नाही तरी ग्रुप आणि कम्युनिटी यांत काय फरक असा सवाल विचार वापरकर्त्यांनी व्हॉट्स अपला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पण याबाबतचा सविस्तर फरक स्पष्ट करणारा व्हिडीओ आता व्हॉट्स अप कडून शेअर करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप (Whats App Group) वापरकर्त्यांना प्रत्येकाला फक्त एकाच ग्रुपमध्ये राहून केवळ एकाचं पध्दतीचं संभाषण (Conversation) करता येत. पण व्हॉट्सअप कम्युनिटीनुसार (Ehats App Community) तुम्ही एकाचंवेळी विविध लोकांबरोब ग्रुपबरोबर संभाषण करु शकता. व्हॉट्सअॅप कम्युनिटीनुसार संबंधित ग्रुपला एकाच ठिकाणी आणण्यास, शाळा, परिसर, शिबिरे आणि बरेच काही यांच्याशी कनेक्ट होण्यास आणि प्रत्येकाला लूपमध्ये ठेवण्यास मदत करतो. (हे ही वाचा:- Metro Ticket On What's App: आता मेट्रो तिकीट थेट व्हॉट्स अॅपवरुन बुक करता येणार, जाणून घ्या तिकीट बुकींग प्रक्रिया)
WhatsApp मध्ये आता ग्रुप पोल फीचर (Group Pole Feature) आले आहे. याचा वापर वोटिंग करण्यासाठी केला जाईल. याशिवाय, आता एका ग्रुपमध्ये १०२४ लोकांना जोडले जाईल. याआधी ही संख्या ५१२ लीमिट होती. WhatsApp Communities फीचरला ग्लोबली जारी करण्यात आले आहेत. खूप दिवसापासून टेस्टिंग केल्यानंतर आता मेटाच्या मालकीच्या WhatsApp ने अखेर आपल्या कम्यूनिटी फीचरला जारी केले आहे.