Weak Passwords of 2019: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच लोक आता रांगेत उभं राहण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्यास चालना देत आहेत. परंतु, अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना लोकांची फसवणूक होते. तसेच ऑनलाईन बँक अकाऊंट, ई-मेल, सोशल मीडियावरील डिजीटल अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. युजर्स आपल्या अकाऊंटचे लॉग इन करण्यासाठी अगदी सोप्या पासवर्डचा वापर करत आहेत. त्यामुळे हॅकर्संना हा पासवर्ड हॅक करणं कठीण राहिलेलं नाही. सायबर सिक्युरीटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक युजर्स सहज हॅक होता येतील, अशा पासवर्डचा वापर करत आहेत. सहज हॅक करता येतील अशा पासवर्डची यादी सायबर सिक्युरीटी फर्मने जाहीर केली आहे. तुम्हीही अशा सोपे आणि सहज हॅक करता येईल असे पासवर्ड वापरत असाल तर वेळीच सावधान व्हा. चला तर मग कोणते पासवर्ड सहज हॅक केले जाऊ शकतात याची यादी जाणून घेऊयात...
आपली डिजीटल माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपला पासवर्ड अधिक कठीण असणं आवश्यक आहे. सिक्युरीटी सर्व्हिस फर्मने लीक झालेल्या 50 लाखाहून अधिक पासवर्डसची तपासणी केली. यातील अगदी सोप्या आणि सहज हॅक करता येतील अशा 50 पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पासवर्ड 2019 या वर्षातील सर्वात जास्त असुरक्षित पासवर्ड ठरले आहेत. (हेही वाचा - तुमचा सोशल मीडियावरील पासवर्ड सुरक्षित आहे का? 'या' पद्धतीने तपासा)
आपल्या डिजीटल सुरक्षिततेसाठी खालील पासवर्ड वापरणे टाळा -
- 123456
- 123456789
- qwerty
- password
- 1234567
- 12345678
- 12345
- iloveyou
- 111111
- 123123
- abc123
- qwerty123
- 1q2w3e4r
- admin
- qwertyuiop
- 654321
- 555555
- lovely
- 7777777
- welcome
- 888888
- princess
- dragon
- password1
- 123qwe
अनेकदा युजर्स आपल्या नावावरून किंवा वैयक्तिक माहितीवरून पासवर्ड ठेवत असतात. त्यामुळे हॅकर्संना हे पासवर्ड ओळखणं सोप होतं. त्यामुळे पासवर्ड ठेवताना नेहमी वेगवेगळ्या संख्या, अक्षरे आणि संकेतचिन्हांचा वापर करा. जेणे करून तुमचा पासवर्ड हॅक केला जाणार नाही आणि तुमची डिजीटल माहिती सुरक्षित राहिल.