चोरीला गेलेला मोबाईल परत कसा मिळवाल ?
मोबाईल (प्रतिकात्मक फोटो) (Photo Credits: Pixabay)

आजकाल मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गर्दीत, रेल्वेत फोन हमखास चोरीला जातात. गणेशोत्सवाच्या गर्दीत तर अशा घटना अधिकच वाढू लागतात. पण मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात आधी आपण पॅनिक होतो. भयंकर गोंधळतो, घाबरतो आणि हताश होतो. पण फोन चोरी होवू नये म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फोन चोरी झालाच तर काय करावे, हे माहित असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही खास टिप्स... लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

# या टिप्सच्या साहाय्याने तुम्ही चोरी झालेला फोन परत मिळवू शकता. मात्र त्यासाठी मोबाईलमध्ये काही सेटिंग्स करुन घ्याव्या लागतील.

# मोबाईलमधील माय अॅक्टिव्हीटी फिचर ऑन ठेवा. यावरुन तुम्ही सर्व डिव्हाईसची अॅक्टिव्हीटी ट्रॅक करु शकता. ही माहिती तुम्हाला myactivity.google.com वर उपलब्ध होईल.

# म्हणजे फोन चोरीला गेल्यानंतरही चोराच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल आणि फोन परत मिळण्यास मदत होईल.

फोन चोरीला गेल्यावर नेमके काय करावे ?

- सर्वप्रथम पोलिसांकडे एफआयआर करा. आयएमईआय नंबर पोलिसांना द्या.

- तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा. त्यामुळे तुमच्या बॅंक अकाऊंट किंवा क्रेडीट कार्डचा कोणी गैरवापर करणार नाही.

- फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व अकाऊंटचे पासवसर्ड बदला.

- फोनमधील ट्रॅकींग किट नेहमी अॅक्टीव्ह ठेवा. ते नेहमी तपासत राहा आणि फोन चोरीला गेला तर त्यावरुन तो ट्रॅक करत राहा.