लालबागच्या राजाला झालेल्या गर्दीत चोरांचा सुळसुळाट
लालबागचा राजा 2018 (Photo Credits: Twitter)

मुंबई :  लालबागचा राजा हा मुंबईतील लोकप्रिय सार्वजनिक मंडळांपैकी एक आहे. लालबागच्या चिंचोळ्या गल्लीत या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देशा-परदेशातील सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही गर्दी करतात. गणेश भक्तांच्या या गर्दीचाच फायदा घेत यंदा लालबागच्या राजाच्या रांगेत भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. असं बदललं मागील 85 वर्षात लालबागच्या राजाचं रूप 

मोबाईल चोरांचा सुळसुळाट

लालबागच्या राजाला यंदा पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी गर्दी केली. गणेशभक्तांना वेळेत आणि सुरक्षित दर्शन मिळवून देण्यासाठी स्वयंसेवकांसोबतच मुंबई पोलिसांची फौजही तैनात आहे. मात्र गणेशभक्तांच्या गर्दीचा फायदा घेत अनेकांचे स्मार्टफोन्स लंपास केल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये आल्या आहेत. मागील काही दिवसात १३५ मोबाईल फोन्स चोरल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत.  घरबसल्या लालबागच्या राजाचं दर्शन आणि आरती येथे पहा LIVE

पोलिसांसमोर आव्हान

दिवसाला हजारो भाविक लालबाग परिसरामध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे इतक्या लोकांमध्ये भुरट्या चोरांवर लक्ष ठेवणं, त्यांना पकडणं अवघड होऊन बसलं आहे. सीसीटीव्हीच्या फूटेजवरून चोरांचा तपास लावण्याचं काम सुरू आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीदरम्यान 'या' गोष्टींबाबत सुरक्षा नक्की बाळगा