मुंबईतील 'नवसाचा गणपती' गणपती म्हणून ओळख असलेला लालबागचा राजाची पहिली झलक नुकतीच दाखवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची ख्याती देशा-परदेशात पोहचली आहे. त्यामुळे दरवर्षी मुंबईतील लालबाग भागात गणेशभक्त तासन तास रांगेत थांबून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. यंदा लालबागच्या राजाचं 85वं वर्ष आहे. नक्की पहा ८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप
लालबागच्या राजाचं मुखदर्शन
सोशल मीडियाच्या माध्यमातून लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची मूर्ती 2000 सालापासून एका विशिष्ट प्रकारातच साकरली जाते. यंदादेखील लालबागच्या राजाचं हे मनमोहक रूप पहायला मिळालं.
LalbaugchaRaja First look 2018 #Lalbaugcharaja @twitterindia https://t.co/azwkGVWNSs
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 11, 2018
महाल सोडून निसर्गाच्या सानिध्यात लालबागचा राजा
लालबागच्या राजाचा देखावा यंदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी टेक्नोलॉजीचा वापर करून गणेशमूर्ती जीवंत देखावा साकारण्यात आला आहे. यामधून निसर्गप्रेमाचा संदेश देण्यात आला आहे. मूर्तीकार संतोष कांबळी यांनी ही मूर्ती साकारली आहे.
लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन आणि आरती
13 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 4 वाजता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पूजा केली जाईल. सकाळी 6 वाजल्यापासून लालबागचा राजा पुढील दहा दिवसांसाठी भाविकांना दर्शनासाठी खुला असेल. 22 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत गणपतीचं दर्शन सुरू राहणार आहे. लालबागच्या राजाचं दर्शन मुखदर्शन आणि चरणस्पर्श अशा दोन वेगवेगळ्या स्वरूपात दिलं जातं. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोन स्वतंत्र रांगा आहेत. काही वर्षी गणपतीचं विसर्जन ५ किंवा ७ दिवसांनी का होतं?
गर्दीमुळे तुम्हांला थेट रांगेत उभं राहून दर्शन घेणं शक्य नसेल तर लालबगच्या राजाची आरती आणि दर्शन 24 तास ऑनलाईन स्वरूपात सोशल मीडियावर खुलं करण्यात आलं आहे. त्यासाठी खालील लिंकवर नक्की क्लिक करा.