वोडाफोन (Vodafone) कंपनीने ग्राहकांसाठी 16 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन जारी केला आहे. तर फिल्मी रिचार्ज असे या प्लॅनचे नाव असून 2G ते 4G पर्यंतच्या ग्राहकांना या नव्या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. परंतु काही ठिकाणीच हा प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे. आसाम, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये जारी केला आहे. वोडाफोन धारकांना हा प्लॅन वोडाफोन डॉट इन, माय वोडाफोन अॅप किंवा रिचार्ज धारकांकडून प्लॅन खरेदी करता येणार आहे.
त्याचशिवाय, वोडाफोन अन्य डेटा एक्सक्लूसिव्ह प्लॅन उपलब्ध करुन देणार आहे. कंपनी 33 रुपये आणि 98 रुपयांचा प्लॅन अन्य शहरात उपलब्ध करुन देत आहे. तर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दल अधिक माहिती दिली असून 16 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला 24 तासांसाठी 1 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनच्या मदतीने सर्व उपभोक्ता पूर्ण एक व्हिडिओ स्ट्रिमिंग करु शकतात.(हेही वाचा-येत्या 5 महिन्यांत सुरु होणार Whatsapp Pay; आता पैसे पाठवणे होणार आणखी सोपे)
परंतु लक्षात राहू दे 16 रुपयांमध्ये कोणताही वॉईस किंवा एसएमएसचा लाभ मिळणार नाही आहे. फक्त हा डेटा प्लॅन आहे. त्याचसोबत युजर्स आपल्या अकाऊंटची वैधता वाढवू सुद्धा शकणार आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने युथ ऑफरची घोषणा केली होती. त्यामध्ये अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शनवर 50 टक्के डिस्काउंट देण्यात येत होते.