Vodafone 100% Cashback Offer : टेलिकॉम क्षेत्रामध्ये रिलायन्स जिओची (Reliance Jio) एंट्री झाल्यापासून स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. जिओच्या मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवेमुळे इतर कंपन्यांना आपले ग्राहक टिकवून ठेवण्याचं आव्हान दिवसेंदिवस कठीण होत आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी साऱ्याच कंपनी नवनवे प्लॅन घेऊन आले आहेत. काही दिवसांपूर्वीच आयडिया (Idea) आणि व्होडाफोन (Vodafone) या दोन मोबाईल कंपनी आता ग्राहकांना एकत्र मिळून सुविधा देत आहेत. नुकताच व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी खास 100% कॅशबॅकची ऑफर जाहीर केली आहे.
व्होडाफोनच्या काही विशिष्ट प्रीपेड ग्राहकांना आता मोबाईल रिचार्जवर 100 % कॅशबॅक मिळणार आहे. व्होडाफोनच्या 399, 458आणि 509 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना काही कुपन्स मिळणार आहेत. हे रिचार्ज केल्यावर ग्राहकांच्या अकाऊंटवर 50 रुपयांचे कॅशबॅक कूपन जमा होणार आहेत. ही कुपन्स रिडिम करण्यासाठी व्होडाफोन ऍपची मदत होणार आहे पुढील रिचार्जच्या वेळेस ग्राहकांना त्याचा फायदा होईल.
399 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांना 50 रुपयांची 8 कूपन्स, 458 रुपयांच्या रिचार्जसाठी 9 कूपन्स, तर 509 रुपयांच्या रिचार्जसाठी 10 कूपन्स मिळतील. व्होडाफोनच्या आधी रिलायन्स जीओ आणि एअरटेल कंपनीने अशाप्रकारे कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे.