व्होडाफोनच्या (Vodafone) ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओने एन्ट्री घेतल्यापासून स्पर्धा खूपच तीव्र झाली आहे. आता जिओला (Reliance Jio) टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने नवा प्लॅन आणला आहे. 180 दिवसांसाठी 154 रूपयांचा नवा प्लॅन आहे. यामध्ये युजर्सना ऑन नेट मिनिटं मिळतात. काही दिवसांपूर्वीच कंपनीने 209 आणि 479 रूपयांचे प्लॅन लॉन्च केले आहेत.
कसा असेल व्होडाफोनचा नवा प्लॅन?
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 180 दिवसांसाठी देण्यात आलेला नवा प्लॅन 600 लोकल ऑन नेट देणार, यासोबतच लोकल मिनिट्सचं गिफ्टदेखील देण्यात येणार आहे. याचा वापर सकाळी 12 ते 6 या वेळेत दिले जाईल. 154 च्या प्लॅनमध्ये लोकल आणि नॅशनल कॉल 2.5 पैसे प्रति सेकेंड असेल. यामध्ये प्रति 10 केबी डाटा साठी 4 पैसे आणि लोकल, नॅशनल एसएमएस साठी अनुक्रमे 1 आणि 1.50 रूपये लागणार आहेत.
सध्या उपलब्ध असलेल्या 209 रूपयांच्या प्रिपेड प्लॅनअम्ध्ये 28 दिवसांची वैधता आहेत. तर 479 रूपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आहे. या दोन्ही प्लॅनसोबत डाटा व्यक्तिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस याची सोय देण्यात आली आहे. हा प्लॅन जिओला टक्क्र देण्यासाठी बाजारात आणला आहे अशी चर्चा आहे.