Vodafone Idea च्या युजर्ससाठी नवी सुविधा! WhatsApp द्वारे करु शकता पेमेंट; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Vodafone Idea New Logo (Photo Credits: Company website)

वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) युजर्ससाठी नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) आणि बिल पेमेंट (Bill Payments) करणे युजर्ससाठी अगदी सोपे झाले आहे. वोडाफोन आयडिया युजर्स आता त्यांच्या मोबाईलचे पेमेंट व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इतर युपीआय आधारित प्लॅटफॉर्मवरुन करु शकतात. ही पेमेंट सुविधा प्री-पेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. वोडाफोन आयडिया ग्राहक व्हर्च्युअल एजंट मार्फत कोणताही रिचार्ज अगदी दोन क्लिकमध्ये करु शकतात. यासाठी युजर्संना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल आणि VIC द्वारे ते रिचार्ज करु शकतील. यासाठी ग्राहक  96542 97000 या नंबरवर Hi मेसेज करुन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

वोडाफोन आयडिया ग्राहकांसाठी रिचार्ज आणि बिल पेमेंट्स सोपे करण्यासाठी आम्ही एक नवी सुविधा सुरु करत आहोत. ग्राहकांच्या सोयीसाठी ही नवी सुविधा आम्ही अंमलात आणत आहोत. सर्व ग्राहक आपल्या मोबाईलचे रिचार्ज आणि बिल पेमेंट्स व्हर्च्युअल एजंट VIC चा वापर करुन व्हॉट्सअॅप आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करु शकतात, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. (Vodafone Idea ने लॉन्च केला अनलिमिटेड नाइट टाइम डेटा, युजर्सला मिळणार काही खास बेनिफिट्स)

एआयवर आधारित असलेला चाटबोर्ट वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षी लॉन्च केला होता. डिजिटल कस्टमर सर्व्हिस आणि र्व्हच्युअल असिस्टंटसाठी या चॅटबोर्टचा उपयोग होत असे. VIC एजंटमुळे ग्राहकांना त्यांचे बिल पेमेंट, रिचार्ज, प्लॅन अॅक्टीव्हेशन, न्यू कनेक्शन, बिल रिक्वेस्ट, डेटा बॅलन्स यांचा त्वरीत प्रतिसाद मिळेल. व्हिआयसी हे खूप सुरक्षित आणि सोपी सुविधा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

वोडाफोन आयडियाने फेब्रुवारी महिन्यात सर्वात अधिक अपलोड स्पीड दाखवला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये वोडाफोन आयडियाचा मीन अपलोड स्पीड हा 7.2mbps इतका होता. जानेवारी 2021 मध्ये सुमारे 17 लाख नवीन ग्राहक व्हिआय फॅमेलीमध्ये आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.