खुशखबर! Vodafone-Idea ने 'Work From Home' करणा-यांसाठी आणले '3' नवे भन्नाट प्लान्स ज्यात दिवसा मिळेल 3GB डेटा
Vodafone Idea company (PC - Wikimedia Commons )

Coronavirus च्या पार्श्वभूमिवर सरकारने कर्मचा-यांना 'Work From Home' करण्याची मुभा दिली आहे. कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस हा गर्दीत पसरतो. त्यामुळे शक्य असेल तितक्या लोकांनी काम करावे असा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे बरेच कर्मचारी या सुविधेचा लाभ घेत घरून ऑफिसचे काम करत आहे. मात्र घरचा इंटरनेट स्पीड हा ऑफिसच्या स्पीडच्या तुलनेत कमी असल्याने लॅपटॉप अथवा संगणकावर काम करताना अनेक अडथळे येत आहेत. या सर्वाचा विचार करुन जिओ, एअरटेल (Airtel) पाठोपाठ आता व्होडाफोननेही (Vodafone) आपल्या ग्राहकांसाठी वर्क फ्रॉम होम साठी 3 भन्नाट प्लान्स आणले आहेत.

या प्लान्समध्ये 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. या प्लान्समध्ये दिवसा 3GB डेटा मिळणार आहे. याशिवाय व्होडाफोन प्ले, Zee 5 चे फ्री सब्सक्रिप्शनही मिळत आहे. खुशखबर! BSNL चा 'वर्क फ्रॉम होम' करणा-यांसाठी आणला मोफत डेटा प्लान, रोज मिळणार 5GB डेटा

249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस, 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवस आणि 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा वापरण्यास मिळेल. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळत होता. तसेच दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेता येईल.

याआधी रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केला होता. घरी बसून काम करणाऱ्या युजर्ससाठी रिलायन्स जिओने खास प्लॅन सादर करुन खुशखबर दिली आहे. 251 रुपयांचा हा प्लॅन असून याला 'Work From Home Pack' असे नाव देण्यात आले आहे.