BSNL (Photo Credit: Livemint)

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने कर्मचा-यांना 'Work From Home' करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र घरी बसून काम करत असताना इंटरनेट चा स्पीड कमी झाल्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. लोकांची हिच गरज लक्षात घेता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL वर्क फ्रॉम होम करणा-या कर्मचा-यांसाठी महत्त्वाची सेवा प्रदान करत आहे. यामध्ये BSNL ने मोफत इंटरनेट डेटा प्लान आणला आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला 10Mbps च्या स्पीडने 5GB डेटा मिळणार आहे. हा फ्री प्लॅन कंपनीने अंदमान-निकोबारसह देशातील सर्व सर्कल्समधील ब्रॉडबँड युजर्ससाठी आणला आहे.

कोविड-19 चा देशात पसरत चाललेले लोण लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम ची सेवा देण्यात आली आहे. मात्र घरी काम करत असताना कर्मचा-यांना इंटरनेट स्पीडमुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे बीएसएनएलने ही मोफत इंटरनेट डेटा प्लान दिला आहे. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे 5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीने FUP मर्यादा ठेवलेली नाही. अकोला जिल्ह्यात उद्यापासून सलग 3 दिवस 'Lockdown', कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

हा इंटरनेट डेटा जरी मिळत असला तरीही यात कुठलीही व्हॉईस कॉलिंगची नवी सुविधा मिळणार नाही. कॉलिंगसाठी अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्याच सुविधा मिळतील. ‘नवीन प्लॅन केवळ इंटरनेट डेटा बेनिफिटसाठी आहे. पण, बीएसएनएलच्या या प्लॅनचा फायदा सध्या लँडलाइन कनेक्शन असलेल्यांनाच मिळेल. नवीन कनेक्शन घेणाऱ्या युजर्सना याचा फायदा मिळणार नाही’, असे बीएसएनएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच जे आवश्यकतेनुसार ऑफिसमध्ये जात आहेत त्यांच्या साठी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यातच आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी ऑफिसेस मध्ये एअर कंडिशन AC चा वापर टाळावा किंवा कमीत कमी करावा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.