Vivo Y21 स्मार्टफोन भारतात लॉन्च; 5,000mAh बॅटरीसह काय आहेत इतर फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या
Vivo Y21 (Photo Credits: Vivo)

चायनीज स्मार्टफोन मेकर विवो ने वाय21 (Vivo Y21) स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला. हा स्मार्टफोन विवो इंडियाच्या ई-स्टोअर, अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, TataCliq आणि इतर रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या सेलअंतर्गत एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड्सवरुन खरेदी केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. जिओ कस्टमर्ससाठी 7000 रुपयांचे बेनिफिट्स आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे- Diamond Glow आणि Midnight Blue. यात 4GB+64GB चा मॉडल लवकरच उपलब्ध होणार आहे.

Vivo Y21 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+आयपीएस एलसीडी डिस्प्ले 1600x720 पिक्सल सह देण्यात आला आहे. यात MediaTek Helio P35 चिपसेट प्रोसेसर 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. (Flipkart Bonanza Sale: फ्लिपकार्टवर 19 ते 23 ऑगस्ट दरम्यान मोबाईल बोनान्झा सेलला सुरूवात, रिअलमीच्या मोबाईलवर मिळतेय 6000 हजारांपर्यंत सूट)

Vivo Y21 (Photo Credits: Vivo)

स्मार्टफोनमध्ये 13MP चा मेन कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी स्नॅपर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Y21 (Photo Credits: Vivo)

Vivo Y21 मध्ये 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात USB Type-C port, 4G, dual-SIM slots आणि इतर फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y21 स्मार्टफोनच्या 4GB+128GB वेरिएंटची किंमत 15,490 रुपये आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित फनटच 11.1 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.