Vivo X60T स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo X60T (PC - Twitter)

Vivo ने काही काळापूर्वी Vivo X60 या फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरिज बाजारात आणली होती. याच मालिकेचा नवीन स्मार्टफोन, Vivo X60T चीनमध्ये लाँच झाला आहे. हा फोन ऑफलाइन एक्सक्लूसिव मॉडल म्हणून सादर करण्यात आला आहे. या नवीन Vivo X60T स्मार्टफोनचे फिचर, डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स स्टँडर्ड Vivo X60 प्रमाणेच आहेत. नवीन स्मार्टफोन Vivo X60T स्मार्टफोनमध्ये Samsung Exynos 1080 चिपसेट ऐवजी MediaTek Dimensity 1100 SoC चिपसेट वापरला आहे. फोन सिंगल व्हेरिएंट 8 जीबी + 128 जीबी स्टोरेजमध्ये आला आहे. हा फोन फक्त Huacai आणि Force या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. (वाचा - Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 19 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता)

Vivo X60T किंमत 

Vivo X60T स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये 533 डॉलर (सुमारे 40,000 रुपये) आहे. त्याची विक्री सुरू झाली आहे. Vivo X60T भारतात कधी लाँच करण्यात येईल, यासंदर्भात कोणतीही माहिती सांगण्यात आलेली नाही.

Vivo X60T स्पेसिफिकेशन्स -

नवीन Vivo X60T स्मार्टफोन मॉडेलमध्ये 6.56 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 2376 x 1080 पिक्सल आहे. फोन पंच-होल एमोलेड डिस्प्लेसह येईल. फोनचे आस्पेक्ट रेश्यो 19.8:9 आहे. तर स्क्रीन टू बॉडी रेशियो 92.76 टक्के आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48 एमपीचा आहे. या व्यतिरिक्त 13 एमपी सेन्सरसह 2 एक्स टेलिफोटो लेन्स सपोर्ट देण्यात आला आहेत.

Vivo X60T स्मार्टफोन 13 एमपी सेंसरसह येईल. त्याचे अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स 120 डिग्री असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फोनमध्ये ड्युअल सिम, 5 जी, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी सपोर्ट असेल. पॉवरबॅकअपसाठी, विवो एक्स 60 टीमध्ये 4,300 एमएएच बॅटरी आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित असेल.