गुगल नंतर आता ट्वीटर वरील डेटा चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे युजर्ससह कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. युजर्सला ट्वीटरकडून एका इमेलच्या माध्यमातून अॅन्ड्रॉइड अॅपमध्ये ट्वीटर वापरणाऱ्यांना त्यांना तातडीने अपडेट करण्याची सूचना दिली आहे. गेल्या शुक्रवारी ट्वीटरने असे सांगितले आहे की, अॅपमध्ये काही कोड अपडेट करण्यात आले होते. या कोडच्या मदतीने युजर्सचा पर्सनल डेटा अॅक्सेस केला जातो. त्यामुळेच भारतासह जगातील युजर्सचा डेटा चोरी केला जाऊ शकतो.
ट्वीटरने याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, अॅन्ड्रॉइड अॅपच्या मदतीने हॅकर्सनी नॉन-पब्लिक अकाउंट्स संबंधित माहिती अॅक्सेस करु शकत होते. त्याचसोबत अकाउंट कंट्रोल करत ट्वीट करुन डायरेक्ट मेसेज पाठवले जाऊ शकतात. तर एका गुंतागुंतीच्या प्रोसेसच्या मदतीने अॅपमध्ये कोड टाकले जात होते. डेटा चोरी झाल्यामध्ये किती युजर्सचा समावेश आहे याबाबत ट्वीटरने अधिक माहिती दिली नाही आहे. मात्र ट्वीटरने डेटा चोरी न होण्यासाठी ते अपडेट करण्यास सांगितले आहे.(26 करोड पेक्षा अधिक युजर्सच्या फेसबुक डेटाची ऑनलाईन चोरी)