26 करोड पेक्षा अधिक युजर्सच्या फेसबुक डेटाची ऑनलाईन चोरी
फेसबुक (Photo Credits: ANI)

फेसबुक वरील युजर्सचा डेटा लीक होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. त्यात आता अजून एक भर पडली असून पुन्गा एकदा 26 करोड पेक्षा अधिक युजर्सचा डेटा ऑनलाईन पद्धतीने चोरी करण्यात आला आहे. सायबर सिक्युरिटी फर्म Comparitech आणि रिसर्चर बॉब डियाचेंको यांच्या मते 267,140,436 करोड फेसबुक युजर्सचा आयडीस फोन क्रमांक आणि पूर्ण डेटा चोरी झाला आहे. रिपोर्ट मध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्या युजर्सचा डेटा चोरी झाला आहे तो मेसेज किंवा फिशिंग स्किम्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मात्र युजर्सचा पर्सनल डेटा लीक झाला आहे की नाही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. हॅकर्स फेसबुक डेव्हलपरच्या API मधून डेटाची चोरी करतात. त्याचसोबत लीक झालेला डेटा एक्सेस करण्यासाठी हॅकर फोरम येथे उपलब्ध होता. मात्र त्यानंतर आता हा डेटा एक्सेस करणे बंद करण्यात आले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात 40 करोड पेक्षा अधिक फेसबुक युजर्सचे मोबाईल क्रमांकाचा डेटा चोरी केला होता. फेसबुकच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(फेसबुक कंपनीकडून लाखो युजर्सचे Email ID अपलोडट)

 गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुकच्या डेटा चोरी होत असल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. डेटा लीक प्रकरणी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने अध्यक्षपद सोडावे म्हणून वारंवार दबावही आणला गेला होता. त्यात इंस्टाग्रामवरील (Instagram) चा डेटाही लीक झाल्याचा प्रकार घडला होता. इंन्स्टाग्रामच्या 'डेटा डाउनलोड टूल'मध्ये त्रुटी आढळल्याने युजरचा डेटा लीक झाला होता.