ट्वीटरवर आले Hide Reply नावाचे नवे फिचर, जाणून घ्या कसे करते काम
Twitter (Photo Credits-File Image)

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटरने Hide Reply नावाचे नवे फिचर लॉन्च केले आहे. म्हणजेच आता युजर्सला ट्वीटरवर कोणाताही रिप्लाय अयोग्य किंवा आक्षेपार्ह वाटत असल्यास तो लपवता येणार आहे. ट्वीटरच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट हेड सुजैन शी यांनी या फिचरची घोषणा केली आहे. सुजैन यांनी असे म्हटले आहे की, या फिचरच्या माध्यमातून आम्ही युजर्सला ते या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरक्षित असल्याचे दाखवून देणार आहोत.

हाइट रिप्लाय हे फिचर वापरण्यासाठी युजर्सला प्रथम ट्वीटर अकाउंट अपडेट करावे लागणार आहे. जर तुम्ही कोणताही रिप्लाय हाइड करत असल्यास तो तुम्हाला पुन्हा पहाता येणार आहे. त्यासाठी युजर्सला एक ग्रे रंगाचा आयकॉन दिसणार असून त्यावर क्लिक करावे. कंपनीने हे फिचर घेऊन येण्याबाबत यापूर्वी सुद्धा सांगितले होते. कंपनीचे असे म्हणणे होते की, ट्वीटरवर हेल्दी संभाषण करणारे युजर्स आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या नव्या फिचरच्या माध्यमातून ट्वीटरवर आलेला रिप्लाय हाइड करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

तसेच ट्वीटवर लवकरच ट्वीट शेड्युल करण्यासाठी ट्वीटडेकचा वापर केला जातो. त्यानुसार ट्वीटडेकवर युजर्सला कोणत्याही वेळी एखादे ट्वीट वेळ आणि तारखेनुसार शेड्युल करता येते. मात्र अद्याप हे फिचर मुख्य ट्वीटरसाठी लागू करण्यात आले नाही. पण आता शेड्युल ट्वीट करण्यात येणारे फिचर बाबत टेस्टिंग सुरु आहे. कंपनी या फिचरच्या माध्यमातून युजर्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्वीटरच्या या फिचरसाठी कंपनी कढून काम केले जात आहे. कंपनीकडून हे फिचर कधी रोलआऊट करणार याबद्दल महिती देण्यात आलेली नाही. ट्वीट शेड्युल करण्यासाठी ट्वीटरवर असे टाइप करुन बॉटम बार येथे तीन डॉटवर क्लिक करावे लागणार आहे. तेथे युजर्सला तारिख आणि वेळ पोस्ट करुन ट्वीट शेड्युल करता येणार आहे.