आता TV पाहणे होणार स्वत, नव्या नियमानुसार ग्राहकांना द्यावे लागणार कमी पैसे
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

टीव्ही पाहणाऱ्यांसाठी ट्रायने (TRAI) खुशखबर आणली आहे. कारण टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया यांचे चेअरमॅन आरएस शर्मा यांनी असे सांगितले आहे की, ग्राहकांना आता एखादा चॅनल पाहण्यासाठी फक्त 12 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी चॅनलसाठी 19 रुपये आकारले जात होते. त्यांनी असे ही सांगितले की, चॅनलच्या लिस्ट दरात त्याचे पैसे 12 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. त्यामुळे आता चॅनलचे पैसे 19 रुपयांवरुन 12 रुपये झाले आहेत. काही चॅनल पाहण्यासाठी ग्राहकांकडून 5 रुपये वसूल केले जात होते. मात्र नंतर ते 19 रुपये झाले. SD किंवा HD चॅनल पाहण्यासाठी विविध दर आकारले जात होते.

1 जानेवारी पासून ट्रायने चॅनलच्या दराबाबत नवा आदेश दिला आहे. त्यामध्ये ग्राहकांना नेटवर्क कॅरिज फी अंतर्गत फक्त 130 रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये ग्राहकांना 200 फ्री चॅनल पाहता येणार आहे. त्याचसोबत ब्रॉडकास्टर्सना 19 रुपये चॅनलचे दर त्यांच्या बुके मध्ये देता येणार नाही आहे. जर तुम्ही फक्त फ्री चॅनल खरेदी करत असल्यास ग्राहकाला प्रत्येक महिन्याला 160 रुपये द्यावे लागणार आहेत. ब्रॉडकास्टर 15 जानेवारी पर्यंत त्यांच्या चॅनलच्या दरात बदल करणार आहेत. 30 जानेवारी पर्यंत पुन्हा एका चॅनलचे नवे दर असलेली लिस्ट जाहीर केली जाणार आहे. तर 1 मार्च 2020 पासून नवे दर लागू होणार आहेत.(Airtel Digital TV ची शानदार ऑफर, नव्या युजर्सला 1100 रुपयात खरेदी करता येणार SD बॉक्स)

नव्या नियमानुसार स्वस्त दरात टीव्ही पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षात ट्रायने नवी टॅरिफ पॉलिसी लागू केली होती. त्यामध्ये ग्राहकांना फक्त त्यांना जे चॅनल पहायचे आहे त्याचे पैसे द्यावे लागत होते. त्याचसोबत ग्राहकांना प्रत्येक चॅनल ब्रॉडकास्टर्स पॅकेज देण्यात येत होते. त्यामुळे ग्राहकांना त्यांना जे चॅनल पहायचे नाहीत त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागत होते.