टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच डीटीएच सेक्टर मध्ये त्यांच्या कामाबाबत जोरदार टक्कर सुरु आहे. तर प्रत्येक कंपनीला त्यांच्या ग्राहकांची संख्या कशी वाढेल याबाबत प्रयत्न करण्यात येत असून विविध सुविधा, ऑफर घेऊन येत आहेत. याच पार्श्वभुमीवर एअरटेल डिजिटल टीव्ही यांनी सुद्धा एक शानदार ऑफर आणली आहे. त्यानुसार नव्या युजर्सला शिखाला परवडतील अशा किंमतीत एअरटेल डिजिटलचा एचडी आणि एसडी सेटअप बॉक्स खरेदी करता येणार आहे.
कंपनीकडून त्यांच्या युजर्ससाठी तीन सेटअप बॉक्स ऑफर करत आहे. त्यामध्ये एसडी, एचडी आणि नुकताच लॉन्च करण्यात आलेला एअरटेल एक्सट्रीम बॉक्स यांचा समावेश आहे. त्याचसोबत कंपनी अन्य ऑफर सुद्धा त्यांच्या युजर्सला देणार आहे. सेटअप बॉक्सच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास डिजिटल टीव्हीचा एसडी बॉक्ससाठी 1100 रुपये आणि एचडी सेटअप बॉक्साठी 1300 रुपये मोजावे लागणार आहेत. एअरटेल एक्सट्रीम सेटअप बॉक्सची किंमत 3999 रुपये आहे. मात्र लिमिटे़ ऑफर अंतर्गत कंपनी एअरटेल थॅंक्स युजर्ससाठी तो 2249 रुपयांना उपलब्ध करुन देत आहे. डिश टीव्ही सोबत याची तुलना केली असता 1750 रुपयांनी स्वस्त आहे.(Airtel कंपनीकडून ग्राहकांना झटका, टॅरिफ प्लॅनच्या दरात पुन्हा वाढ)
तर टाटा स्काय त्यांच्या युजर्ससाठी चार सेटअप बॉक्स ऑफर करत आहे. त्यामध्ये SD,HD,+HD आणि अल्ट्रा हाय डेफिनेशन 4K सेटअप बॉक्स सहभागी आहेत. टाटा स्कायचा SD सेटअप बॉक्स 1399 रुपये, HD बॉक्स 1499 रुपये, +HD बॉक्स 9300 आणि 4K बॉक्स 6400 रुपयांना खरेदी करता येणार आहे. डिश टीव्हीसाठी सुद्धा तीन ऑप्शन आहेत. त्यात DishNXT HD, DishNXT SD आणि DishSMRT Hub उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.