महाराष्ट्र सायबल सेल (Maharashtra Cyber) कडून एक अॅडव्हायजरी जारी करत TikTok Pro लिंक असणारे मेसेज ओपन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, खोट्या Tiktok Pro links बनवून युजर्सचा खाजगी डाटा, माहिती चोरण्याच्या यामधून प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्या भारतामध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप TikTok याच्यावर बंदी आहे. त्याचा गैरफायदा घेत काहींनी तसेच भासणारे अॅप बनवून युजर्सना गंडा घालण्याचा नवा पर्याय शोधला आहे. टिकटॉकला टक्कर देणाऱ्या चिंगारी अॅपला युजर्सचा तुफान प्रतिसाद; गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 10 लाख डाऊनलोड्स.
सायबर सिक्युरिटी अथॉरिटीच्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप किंवा टेक्स मेसेजच्या माध्यमातून फसव्या टिक टॉक प्रो च्या लिंक शेअर केल्या जात आहे. यावर क्लिक केल्यास माल्व्हेअरला तुमच्या फोटो, मेसेज, नोट्सची माहिती मिळवता येऊ शकते. दरम्यान Tiktok Pro असे कोणतेही अॅप गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लिंक आल्यास ती ओपन करण्याच्या, डाऊनलोड करण्याच्या, वापरण्याच्या नादात पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
Maharashtra Cyber ट्वीट
Citizens are requested to be aware of the new TikTok scam happening under the name of a malware app 'TikTok Pro'@DGPMaharashtra @CyberDost #CyberSafety #CyberSecurity pic.twitter.com/KqWk70KhbV
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 8, 2020
भारतामध्ये केंद्र सरकार कडून TikTok सह 58 अन्य चीनी अॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. सध्या ही अॅप्स संपूर्ण देशभर बंद असून गूगल प्ले स्टोअर, अॅपल स्टोअर वरून देखील हटवण्यात आली आहेत. यामध्ये युसी ब्राऊझर, हेलो, शेअर चॅट सारख्या अॅप्सचा समावेश आहे.