TikTok लवकरच एका नवीन नावाने भारतीय बाजारात एन्ट्री घेण्याची शक्यता; ByteDance ने सादर केला 'TickTock' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज

शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक हे भारतात पुनरागमन करू शकेल, पण यावेळी ते कदाचित TickTock या नावाने भारतामध्ये एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. एका नवीन ट्रेडमार्क अॅपने हे सूचित केले आहे.

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|
TikTok लवकरच एका नवीन नावाने भारतीय बाजारात एन्ट्री घेण्याची शक्यता; ByteDance ने सादर केला 'TickTock' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज
TikTok (Photo Credits-Gettey Images)

शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक हे भारतात पुनरागमन करू शकेल, पण यावेळी ते कदाचित TickTock या नावाने भारतामध्ये एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. एका नवीन ट्रेडमार्क अॅपने हे सूचित केले आहे. न्यूज 18 ने टिप्सटर मुकुल शर्मा यांच्या हवाल्याने सांगितले की, TikTok ची पॅरेंट फर्म बाईटडन्सने या महिन्याच्या सुरूवातीस पेटंट कंट्रोलर जनरल, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सकडे TickTock साठी ट्रेडमार्क फाईल केला आहे. टिकटॉक हे गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने बंदी घातलेल्या 59 चिनी अॅप्सपैकी एक आहे. बंदीनंतर लगेचच टिकटॉकने आपले अ‍ॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकले होते.

बाईटडान्सने 6 जुलै रोजी टिकटॉकसाठी 'TickTock' या नावासह ट्रेडमार्क अर्ज दाखल केला होता, जो ट्रेड मार्क नियम 2002 च्या अनुसूचीच्या वर्ग 42 अंतर्गत दाखल केला आहे. टिपस्टर मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर याबाबत रिपोर्ट दिला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, टिकटॉकला देशात परत आणण्यासाठी बाईटडन्स सरकारशी चर्चा करीत आहे. चिनी कंपनीने अधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, ते नवीन आयटी नियमांचे पालन करतील. 2019 मध्ये, बाईटडन्सने भारतात त्यांचा मुख्य नोडल आणि तक्रार अधिकारी नियुक्त केला होता. (हेही वाचा: Highest Internet Speed: इंटरनेट गतीबाबत जपानने नोंदवला विश्वविक्रम; मिळवले तब्बल 319 Tbps स्पीड)

बंदीच्या वेळी टिकटॉकचे देशात सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते होते. आता अशा वापरकर्त्यांना रील्स आणि स्टोरीजद्वारे इन्स्टाग्राम आणि यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप्सची मागणी %A1%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95+%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C&body=Check out this link https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Ftechnology%2Ftiktok-likely-to-enter-indian-market-soon-under-a-new-name-bytedance-has-submitted-a-trademark-application-for-the-name-ticktock-270218.html" title="Share by Email">

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|
TikTok लवकरच एका नवीन नावाने भारतीय बाजारात एन्ट्री घेण्याची शक्यता; ByteDance ने सादर केला 'TickTock' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज
TikTok (Photo Credits-Gettey Images)

शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक हे भारतात पुनरागमन करू शकेल, पण यावेळी ते कदाचित TickTock या नावाने भारतामध्ये एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. एका नवीन ट्रेडमार्क अॅपने हे सूचित केले आहे. न्यूज 18 ने टिप्सटर मुकुल शर्मा यांच्या हवाल्याने सांगितले की, TikTok ची पॅरेंट फर्म बाईटडन्सने या महिन्याच्या सुरूवातीस पेटंट कंट्रोलर जनरल, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सकडे TickTock साठी ट्रेडमार्क फाईल केला आहे. टिकटॉक हे गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने बंदी घातलेल्या 59 चिनी अॅप्सपैकी एक आहे. बंदीनंतर लगेचच टिकटॉकने आपले अ‍ॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकले होते.

बाईटडान्सने 6 जुलै रोजी टिकटॉकसाठी 'TickTock' या नावासह ट्रेडमार्क अर्ज दाखल केला होता, जो ट्रेड मार्क नियम 2002 च्या अनुसूचीच्या वर्ग 42 अंतर्गत दाखल केला आहे. टिपस्टर मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर याबाबत रिपोर्ट दिला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, टिकटॉकला देशात परत आणण्यासाठी बाईटडन्स सरकारशी चर्चा करीत आहे. चिनी कंपनीने अधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, ते नवीन आयटी नियमांचे पालन करतील. 2019 मध्ये, बाईटडन्सने भारतात त्यांचा मुख्य नोडल आणि तक्रार अधिकारी नियुक्त केला होता. (हेही वाचा: Highest Internet Speed: इंटरनेट गतीबाबत जपानने नोंदवला विश्वविक्रम; मिळवले तब्बल 319 Tbps स्पीड)

बंदीच्या वेळी टिकटॉकचे देशात सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते होते. आता अशा वापरकर्त्यांना रील्स आणि स्टोरीजद्वारे इन्स्टाग्राम आणि यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप्सची मागणी वाढली आहे म्हणून टिकटॉकला पर्याय म्हणून अनेक भारतीय कंपन्यांनी त्यांचे अ‍ॅप्स बाजारात आणले आहेत. जूनच्या सुरुवातीस अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनी ट्रम्प यांच्या काळात Tiktok आणि Wechat वर लादण्यात आलेली बंदी हटवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस