सॅन फ्रान्सिस्कोस्थित सुरक्षा कंपनी क्वांट्सटॅम्पचे मुख्य कार्यकारी रिचर्ड मा यांनी, या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पत्नीसाठी एक ड्रेस बनविला, ज्यावर त्यांनी तब्बल 9,500 अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 7 लाख रुपये खर्च केले आहेत. महत्वाची गोष्ट अशी की, ज्या ड्रेसवर इतका पैसा खर्च झाला आहे त्या ड्रेसला तुम्ही स्पर्शही करू शकत नाही. वास्तविक पाहता हा जगातील पहिला डिजिटल ड्रेस (Digital Dress) आहे. फॅशन हाऊस 'द फॅब्रिकेंट' यांनी हा ड्रेस डिझाइन केला आहे. या ड्रेस सादर करण्यासाठी रिचर्डची पत्नी मेरी रेनच्या प्रतिमेचा वापर केला गेला आहे.
या ड्रेसच्या दीर्घकालीन फायद्यामुळेच हा ड्रेस तयार केला गेला आहे. हा ड्रेस नक्की कसा वापरला जाऊ शकतो याबद्दल फारसी माहिती मिळू शकली नाही. परंतु या ड्रेसला तुम्ही हात लावू शकत नाही, किंवा तो परिधानही करू शकत नाही. हा खरा ड्रेस नाही, याचा उपयोग सोशल मीडियावर आपला लूक वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
असे म्हटले जात आहे की, हा डिजिटल ड्रेस अशा इन्स्टाग्राम सेलिब्रिटींना चांगला आहे ज्यांना, आपला लूक रिअल ड्रेसशिवाय नवीन स्टाईलमध्ये सादर करायचा आहे. याबाबत फॅब्रिकेंट म्हणते, ‘हा डिजिटल ड्रेस खरेदीदाराच्या फोटोच्या आधारे तयार केला गेला आहे आणि बनवण्यासाठी डिझाइनर 2 डी नमुने वापरतात. अलिकडच्या काळात, इंस्टाग्रामवर आभासी मॉडेल्सची उपस्थिती वाढली आहे, ज्यासाठी डिजिटल ड्रेस एक उपयुक्त गोष्ट असू शकते. (हेही वाचा: धक्कादायक! Instagram सह अनेक अॅप्सद्वारे चालू होती महिलांची व्रिक्री; प्रशासनाने उचलले कडक पाऊल)
कार्लीन्ग्स हे डिजिटल पद्धतीने कपडे डिझाइन करणारे अजून एक फॅशन हाऊस आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नऊ पाउंड ($ 11) मध्ये एक असे डिजिटल स्ट्रीट वेअर कलेक्शन सादर केले होते, जे एका महिन्यात संपले होते.