
बीबीसी न्यूज अरबीच्या (BBC News Arabic) एका तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. फेसबुकच्या मालकीचे अॅप इंस्टाग्रामसह (Instagram) गुगल आणि अॅपल स्टोअर्स असे अनेक अॅप्स कार्यरत आहेत जे गुलामांची विक्री करत आहेत. या अॅप्सच्या मदतीने गुलामांचा ऑनलाईन बाजार चालत आहे. ‘ट्रान्सफर फॉर दासी' किंवा 'विक्रीसाठी दासी' अशा शब्दांद्वारे हॅशटॅगसह या महिलांचा परिचय देण्यात येत असे. अशाप्रकारे इतर देशांतील महिलांची अरब देशांमध्ये विक्री केली जात असे. विक्री झाल्यानंतर या देशांमध्ये महिलांना कामगार म्हणून पाठविले जाते असे. दिले जाते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुवैत प्रशासनाने त्वरित या जाहिराती काढण्याचे आदेश जारी केले आहेत. यासह, असे अॅप्स तयार करणार्या कंपनीकडून कायदेशीर आश्वासन घेण्यात आले आहे की, गुलामांच्या ऑनलाइन बाजारासाठी नवीन खाते तयार करण्यावर बंदी घातली जावी. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही कामामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग दाखवू नये. फेसबुकने याबाबत स्पष्टीकरण देताना, आपल्याकडून अशा गोष्टींवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केलेल्या गोष्टी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आल्या आहेत.
कुवैत येथील मेनपावरच्या सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. मुबारक अल-अजीमी यांनी बीबीसीच्या अहवालात नमूद केलेल्या एका महिलेचा शोध चालू असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, हा शोध चालू असलेली महिला या अॅपद्वारे गिनी येथील 16 वर्षाच्या मुलीची विक्री करीत होती. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय वकील किम्बरले मोटोली यांनी असे म्हटले आहे की, अॅप डेव्हलपर्सनी अशा महिलांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.