PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

Aadhar-PAN Linking: पॅन व आधार क्रमांक जोडणीची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळे तुम्ही 31 मार्च पर्यंत आपले आधार-पॅन कार्ड लिंक केले नाही, तर तुमचं पॅन कार्ड रद्द केलं जाणार आहे. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. यापूर्वी अनेकदा सरकारने आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदत दिली होती. आता पुन्हा एकदा ही मुदत वाढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात-लवकर तुमचं पॅन-आधार लिंक करा.

पॅन-आधार जोडणीची मुदत 31 डिसेंबर 2019 अखेरीस संपली होती. मात्र नागरिकांच्या मागणीमुळे यात 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता येत्या 31 मार्चला संपणार आहे. पॅन रद्द होईल म्हणजे नेमके काय हे सरकारने अद्याप स्पष्ट केले नाही. परंतु, अर्थ विश्लेषकांच्या मते, पॅन कार्ड रद्द झाल्यास संबंधित नागरिकास प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यात अडचणी येऊ शकतात. (हेही वाचा - Vodafone Idea चे भारतातील अस्तित्व धोक्यात? 1 लाखाहून अधिक लोक होऊ शकतात बेरोजगार)

प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 जानेवारीपर्यंत 30.75 कोटी पॅनकार्ड आधार कार्डशी यशस्वीपणे जोडण्यात आले आहेत. परंतु, अद्याप 17.58 पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्यात आलेले नाहीत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020 पूर्वी पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्यात आले नाही तर ते निष्क्रीय ठरेल. तसेच ज्या नागरिकांचे पॅनकार्ड निष्क्रीय ठरेल ते प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कारवाईसाठी पात्र ठरतील.