Samy Android TV (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सॅमी इनफॉर्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेटड (Samy Informatics Pvt. LTD) या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त 32 इंची स्मार्ट एलईडी टीव्ही भारतात लॉन्च केला आहे. Samy Android TV  असे या टीव्हीला नाव देण्यात आले आहे. या किमतीमध्ये अशा प्रकारचे फीचर्स असलेला टीव्ही कुठेही मिळणार नाही असा दावा कंपनीने केला आहे. भारतीय बाजारात या टीव्हीची किंमत फक्त रुपये 3,999 इतकी आहे. महत्वाचे म्हणजे या टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. ज्या किमतीमध्ये आजकाल चांगले स्मार्टफोनही मिळत नाही, अशा किमतीमध्ये चक्क 32 इंच टीव्ही देऊ करून कंपनीने एक मोठा विक्रमच प्रस्थापित केला आहे.

या टीव्हीमध्ये Screen Mirror आणि WiFi सह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. तसेच हॉटस्पॉट आणि साउंड ब्लास्टर हे फीचरही यात समाविष्ट केले गेले आहेत. Android 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर हा टीव्ही चालणार आहे. टीव्हीमध्ये 10 वॉटचे स्पीकर्स, 4GB रॅम आणि 512MB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. म्हणजे एखाद्या फोनमध्ये असतात त्याप्रमाणे तुम्ही या टीव्हीचा वापर करू शकणार आहात. सोबतच एचडी साउंडसाठी SRS डॉल्बी डिजिटल आणि 5 बॅन्ड इक्वलायजर सेटिंग्स सुद्धा आहेत. टीव्हीसोबत कंपनी ऑन साइट वॉरंटी आणि ऑनसाइट सर्व्हिस सुद्धा देत आहे. या टीव्हीचे पार्टस भारतातच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया अंतर्गत बनवले जाणार आहेत. (हेही वाचा : ASUS कंपनीने भारतात लॉन्च केले जगातील सर्वात लहान Laptop जाणून घ्या किंमत आणि खासियत)

या प्रसंगी सॅमी इनफॉर्मेटिक्स (Samy Informatics) चे संचालक अविनाश मेहता यांनी सांगितले, ‘या स्मार्टटीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट मिळनार आहेत. यात तुम्ही गेम सुद्धा खेळू शकता. सॅमीचे अधिकृत अॅप सुद्धा टीव्हीत आहे. आपण हे अॅप प्ले स्टोरवरून सुद्धा इंस्टॉल करू शकता.’ ग्राहक हा टीव्ही पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशा या राज्यांमध्ये ऑफलाईन विकत घेऊ शकतात. मात्र हा टीव्ही खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आयकार्ड असणे आवश्यक आहे.