ASUS कंपनीने भारतात लॉन्च केले जगातील सर्वात लहान Laptop जाणून घ्या किंमत आणि खासियत
ASUS Zenbook 15 (Photo Credits- Twitter)

असुस (ASUS) या कंपनीने त्यांचे नवीन लॅपटॉप मॉडेल नुकतेच भारतात लॉन्च केले आहे. तर Zenbook असे या मॉडेलचे नाव असून 13, 14 आणि 15 इंच असणाऱ्या या लॅपटॉपचे मॉडेल गेल्या वर्षी तैवान (Taiwan) येथे लॉन्च करण्यात आले होते. असुस कंपनीकडून लॅपटॉपचे हे मॉडेल सर्वात कॉम्पॅक्ट असल्याचे सांगितले जात आहे. या लॅपटॉप मध्ये नॅनो डिस्प्ले, ऐरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनिअमची बॉडी आणि आठव्या जनरेशनच्या इंटेल कोर प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आले आहे.

असुस झेनबुक स्पेसिफिकेशन

असुसच्या या लॅपटॉपमध्ये 16GB RAM सोबत 8th Generation Intel Core i7 क्वॅड कोर सीपीयू (CPU) पेक्षा कमी आहे. तसेच NVidia GeForce GTX 1050 Max-Q ग्राफिक्स सपोर्ट करु शकणार आहेत. लॅपटॉपला 4K UHD Resolution पर्यंत कॉन्फिगर करता येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, USB 3.1 GEN, USB type C, HDMI Port, Micro SD Card Reader, SD Card Reader आणि USB Type A Port देण्यात आलेले आहे. त्याचसह लॅपटॉपच्या Sound System साठी हार्मन कार्डनचे स्पीकर दिले आहेत. मेमरी आणि स्टोरज बाबत बोलायचे झाल्यास, विडोज 10 पद्धतीवर आधारित हा लॅपटॉप 8GB आणि 16GB RAM वेरियंटसह 256GB/512GB/1TB SSD ऑप्शनमध्ये येतात.

किंमत आणि कुठे मिळेल?

Asus Zenbook 13 आणि Asus Zenbook 14 हे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या वेरियंट मध्ये येतात. तर AsusZenbook 15 हा एकच वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. झेनबुक 13 या मॉडेलची किंमत भारतात 71,900 रुपयांपासून सुरु होणार असून 99,990 रुपयांपर्यंत आहे. तर झेनबुक 14 बेस वेरियंट किंमत 72,990 रुपये आणि टॉप वेरियंटची किंमत 1,00,990 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र झेनबुक 15 ची किंमत ही 1,39,990 रुपये आहे.

असुस कंपनीचे हे सर्व लॅपटॉप Flipkart, Amazon, Paytm सह ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत. तर या लॅपटॉपवर प्रिपेड ऑर्डरवक फ्लिपकार्डकडून 5,000 रुपये सूट देण्यात येत आहे. त्याचसोबत ऐक्सचेंज ऑफरमध्ये 7,500 रुपयापर्यंत सूट देण्यात येत आहे.