Tecno Spark Power 2 Launched in India: भारतात Tecno कंपनीचा टेकनो स्पार्क पॉवर 2 बजेट स्मार्टफोन लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून
Tecno Spark Power 2 (Photo Credit: Twitter)

स्मार्टफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून भारतात टेकनो कंपनीचा टेकनो स्पार्क पॉवर 2 (Tecno Spark Power 2) बजेट स्मार्टफोन आज लॉन्च झाला आहे. ज्यामुळे कमी किंमतीत अधिक वैशिष्ट हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन उपयुक्त ठरणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या टेकनो स्पार्क पॉवर या फोनची पुढील आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि दमदार बॅटरी यांसारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, इतर स्मार्टफोनमधील फिचर्सच्या तुलनेत टेकनो स्पार्क पॉवर 2 ची किंमत कमी आहे. ज्यामुळे बजेट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक प्रकारची लॉटरीच आहे, असे देखील म्हणता येईल.

भारतीय स्मार्टफोन बाजारात दिवसेंदिवस नवे स्मार्टफोन दाखल होत आहेत. परंतु, टेकनो कंपनीचा टेकनो स्पार्क पॉवर 2 बाजारात दाखल झाल्यावर खळबळ निर्माण करेल. तरूणवर्ग या स्मार्टफोनला पसंती दर्शवतील असे विश्वासही कंपनीच्या एका अधिकाऱ्यांना व्यक्त केला आहे. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर फोन 4 दिवसांचा बॅकअप देतो, असाही दावा कंपनीनी केला आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन येत्या 23 जूनपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. हे देखील वाचा- Realme X3 आणि Realme X3 SuperZoom भारतात 25 जून रोजी होणार लॉन्च; पहा काय आहेत फीचर्स

ट्विट-

फिचर्स आणि किंमत घ्या जाणून-

या स्मार्टफोनमध्ये 7 इंच एचडी+ डिस्प्ले इतका मोठा डिस्प्ले असून फोनच्या मागील बाजूला ट्रिप कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. यातील 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर अन्य दोन कॅमेरे 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी वॉटरड्रॉप नॉचच्या आतमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक या फीचर्सचाही या स्मार्टफोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Ice Jadeite आणि मिस्टी ग्रे अशा 2 रंगात उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 इतकी आहे.