सध्याच्या आधुनिक युगात बरीचशी कामे, आर्थिक व्यवहार हे सर्व ईमेलवरुन चालते. अशा वेळी तुमच्या नावाने एखाद्याने मेल करता यावा म्हणून अनेकांना ईमेल च्या शेवटी स्वत:ची सही असावी असे वाटत असते. आपल्या पैकी अनेकांचे Gmail चे अकाउंट असेल. त्यात Gmail Signature फिचर आहे. यात तुम्ही तुमची सही तयार करु शकता. आता सही म्हणजे नेमकं काय असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर Gmail वर सही करणे म्हणजे तुमचे नाव, तुमचे ऑफिसमधील पोस्ट, तुमचा संपर्क, तुमचा पत्ता हे सर्व गोष्टींचा समावेश असतो.
आपल्यापैकी अनेकांना कदाचित ही सही कशी करायची हे माहित असेल. मात्र ज्यांना या फीचर बद्दल माहित नसेल किंवा ते कसे वापरायचे हे कळतं नसेल त्यांनी या फीचरचा उपयोग कराल.
कशी बनवाल Gmail Signature:
1. डेस्कटॉपवर जीमेलवर लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला दिसत असलेल्या Setting पर्यायावर क्लिक करा. एकाच स्मार्टफोनमध्ये दोन क्रमांकावरुन WhatsApp कसे वापराल? जाणून घ्या
2. त्यानंतर General टॅबमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर सिग्नेचर पर्याय दिसेल. त्यातील No Signature च्या खाली दिसत असलेल्या मध्ये जा.
3. त्यानंतर Signature बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्याविषयी जी माहिती टाकायची आहे ती टाका.
हेदेखील वाचा- Google Assistant चे नवे स्मार्ट फिचर, मायबोलीत वाचून दाखवणार वेब पेज
4. सर्व माहिती भरल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Save Changes या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या Gmail आयडीवरुन ज्याला कोणाला मेल पाठवाल त्याच्या खाली ही माहिती दिसेल.
हे फिचर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांसाठी फारच गरजेचे आहे. तुमचे तुमच्या कंपनीतील हुद्दा किंवा तुमचा स्वत:चा बिझनेस असेल तर ते पद मेलमध्ये नमूद केल्यास समोरच्या व्यक्तीवर चांगले इम्प्रेशन पडते.