टेक कंपनी Apple ला फ्रांसने ठोठावला विक्रमी 1.2 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या काय आहे कारण
Apple logo. (Photo Credits: IANS)

फ्रान्सच्या (France) Antitrust रेग्युलेटरने सोमवारी तंत्रज्ञान कंपनी Apple ला विक्रमी असा 1.1 अब्ज युरो (1.2 अब्ज डॉलर्स) दंड ठोठावला आहे. कंपनीला स्वतंत्र किरकोळ विक्रेत्यांसह स्पर्धात्मक व्यवहार करण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. रेग्युलेटरला आपल्या तपासणीत असे आढळले की, Apple ने फ्रान्समधील स्वतंत्र किरकोळ विक्रेत्यांशी, आपल्या दमदार आर्थिक स्थितीचा गैरवापर करून गैर स्पर्धात्मक व्यवहार केले आहेत. या दोन्ही वितरकांनी Apple च्या डिव्हाइससाठी छोट्या किरकोळ विक्रेत्यांकडून समान किंमत आकारली, ज्या किंमतीवर हे डिव्हाइस Apple च्या ऑनलाइन स्टोअरमध्ये किंवा बाजारातील स्टोअरमध्ये उपलब्ध होते.

फ्रान्सचे Antitrust रेग्युलेटर प्राधिकरण प्रमुख इसाबेल दा सिल्वा म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत एखाद्या कंपनीवर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे.' फ्रान्समध्ये कंपनीच्या दोन विक्रेत्यांवर सुमारे 14 कोटी युरोच्या दंडाचा यात समावेश आहे. हा खटला 2012 मध्ये सुरू झाला तेव्हा, स्वतंत्र Apple विक्रेत्याने कंपनीच्या प्रतिस्पर्धीविरोधी वर्तनाबद्दल तक्रार केली. स्वतंत्र विक्रेत्याने आपल्या तक्रारीत इतर कारणांसह हे देखील सांगितले की, कंपनी स्वत: च्या स्टोअरचा फायदा घेण्यासाठी त्याच्या स्टोअरचा ग्राहक पुरवठा खंडित करीत आहे. (हेही वाचा: बिल गेट्स यांनी दिला Microsoft च्या संचालक मंडळाचा राजीनामा; 'हे' आहे कारण)

दरम्यान, याआधी फ्रान्समध्ये Apple ला गेल्या महिन्यात 25 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 200 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. जुना आयफोन अपडेट करण्याच्या बहाण्याने मुद्दाम त्याला स्लो करत असल्याच्या आरोपाने हा दंड आकारण्यात आला. या प्रकरणी एचओपी असोसिएशनने दिलेल्या तक्रारीनंतर, जानेवारी 2018 मध्ये तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणात कंपनी आयफोन ग्राहकांकडून माहिती लपवण्यामध्ये दोषी ठरली