Tata Tigor (Photo Credits: Twitter)

टाटा मोटर्स (Tata Motors) नेहमीच आपल्या आपल्या गाड्यांच्या माध्यमातून काहीतरी नवनवीन गोष्टी देण्याच्या प्रयत्नात असते. टाटा मोटर्स ने आपली नवीन कॉम्पॅक्ट सेडान कार टिगॉर (Tigor) ऑटोमेटिक (एएमटी) व्हेरिएंट लाँच केले आहेत. या नव्या व्हेरिएंटची दिल्लीतील एक्स शोरुमची किंमत 6.39 लाखांपासून सुरु होत आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, कंपनीने आपली टिगॉर एएमटी सीरिजमध्ये एक्सएमए (XMA) आणि एक्सझेडए प्लस (XZA+)हे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. या कारची किंमत 6.39 लाख रुपयांपासून 7.24 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह दोन नवे ट्रिम्स लॉन्च केले जाणार आहेत. नव्या कारमध्ये इंटीग्रेटेड एलईडीसह 15 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील आणि ऑटो-फोल्ड ओआरव्हीएम (रिअर व्ह्यू मिरर) देण्यात आले आहेत. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ड्रायव्हिंग मोड्स सोबत, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसह म्युझिक सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कप होल्डर्ससह फोल्डेबल रिअर आर्मरेस्ट सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सने सांगितले की, नव्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये दोन एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्यूशन, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेंसर, स्पीड डिपेंडेंट ऑटोमेटिक डोअर लॉकिंग सारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

या नव्या कारमध्ये 1.2 लिटरचं तीन सिलिंडरचं रिवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 85 पीएमचा स्पीड आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त कारमध्ये 1.05 लिटरचे तीन सिलिंडरचं रिवोट्रॉक डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे. हे इंजिन 70 पीएस आणि 140 Nm चं टॉर्क जनरेट करते.