भारताची खासगी विमान सेवा कंपनी Spicejet च्या 12 लाख प्रवशांचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कंपनीने युजर्सचा डेटा एन्क्रिप्शन शिवाय ठेवल्याने युजर्सचा डेटा लीक झाला आहे. तर डेटा लीक प्रकरणी कंपनीने त्याबाबत कबुली दिली आहे. टेक क्रंच यांच्या एका रिपोर्ट नुसार, सिक्युरिटी रिसर्चर यांनी स्पाइसजेटच्या डेटाबेसचा एक्सेस करता येत असल्याचा खुलासा केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, एथिकल हॅकिंग अंतर्गत त्यांनी कंपनीचा डेटाबेस एक्सेस केला आहे.
डेटा लीक झाल्याप्रकरणी धक्कादायक बाब अशी होती की, रिसर्चर यांनी अगदी सहजतेने एक्सेस केला आहे. असे सांगितले जात आहे की, डेटा एक्सेस करण्यासाठी लागणारा पासवर्ड अगदी सोपा होता. या डेटाबेस मध्ये कंपनीच्या प्रवाशांच्या डेटाचा बॅकअप घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रवाशाचा क्रमांक, नाव, पत्ता, ईमेल, जन्मतारिख अशा महत्वाच्या गोष्टी डेटाबेस मध्ये लिहिण्यात आल्या होत्या. डेटा लीक झाल्यानंतर सायबर क्राइमबाबतचे गुन्हे पाहणारी सरकारी कंपनी CERT-In यांना अधिक माहिती दिली आहे.(2024 पर्यंत रोबोट करतील मॅनेजर्सची 69 टक्के कामे; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात)
CERN-In यांनी सांगितले की, कंपनीच्या सिक्युरिटीला धोका असल्याने हा प्रकार घडला आहे. त्यानंतर स्पाइसजेट यांना त्यांचा डेटा लीक झाल्याचे सांगण्यात आले. यावर आता कंपनीकडून त्यांचा डेटा सुरक्षित रहावा यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांचा डेटा सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्य असल्याचे कंपनीच्या प्रवक्तांनी म्हटले आहे.