दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी 6000 पेक्षा कमी किंमतीचे 'हे' खास स्मार्टफोन्स !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त गिफ्टची खरेदी तुम्ही सुरु केली असेल. ई कॉमर्स साईट्सवर देखील स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स चालू आहेत. जर तुम्हीही दिवाळीला स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर हे आहेत स्वस्त आणि मस्त पर्याय. 6,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे 4जी फोन्स उपलब्ध होतील...

Redmi 4A

शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर

क्वालकॉम स्नॅपड्रेगन 425 प्रोसेसर देखील आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. हा फोन अॅनरॉईड ओरिओ 8.0 वर काम करतो. यात 3120 एमएएचची बॅटरी आहे. 4जी ड्यूल सिम यात सपोर्ट होईल. या फोनची किंमत 5,999 रुपये आहे.

XOLO Era X

या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात स्नॅपड्रेगन एससी 9830 ए प्रोसेसर देखील आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अॅनरॉईड ओरिओ 8.0 वर काम करतो. फोनमध्ये 2500 एमएएच बॅटरी असून हा फोन 4जी ड्यूल सिमला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 4,899 रुपये आहे.

Micromax Canvas XP 4G

Micromax Canvas XP 4G या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात मीडियाटेक प्रोसेसर देखील आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 8 मेगापिक्सल रियर आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अॅनरॉईड ओरियो 8.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 2000 एमएएच असून हा फोन 4जी ड्यूल सिमला सपोर्ट करतो. फोनची किंमत आहे 5,999 रुपये.

Xolo Era 1X

या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्प्रेडेट्रम एससी 9830ए हा प्रोसेसर आहे. हा फोन 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. तसंच यात 8 मेगापिक्सलचा रियर आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अॅनरॉईड ओरिओ 8.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये 2500 एमएएचची बॅटरी असून हा फोन 4जी ड्यूल सिमला सपोर्ट करतो. या फोनची किंमत आहे 4,000 रुपये.

Micromax Canvas Juice 4G

या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेक प्रोसेसर आहे. 2 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. यात 8 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अॅनरॉईड ओरिओ 8.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 4जी ड्यूल सिमला सपोर्ट करत असून याची किंमत

6,000 रुपये आहे.