WhatsApp (Photo Credits: Pixabay)

लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp ची भूरळ लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच पडली आहे. WhatsApp च्या माध्यमातून संवाद साधणे अधिक सोपे झाले. इमोजी, स्टीकर्सने तर चॅटींगची गंमत अधिकच वाढवली आहे. WhatsApp ने झटपट संवाद साधणे शक्य होत असले तरी अनेकदा प्रायव्हसीची काळजी वाटते. मात्र काही सोप्या सेटिंग्स करुन तुम्ही तुमची ही काळजी दूर करु शकता. तर पाहुया काय आहेत त्या सेटिंग्स...

#लास्ट सीन

लास्ट सीनमुळे तुम्ही व्हॉट्सअॅपवर अॅक्टीव्ह असल्याची माहिती इतरांना कळते. त्यामुळे सेटींग्समध्ये जावून तुम्ही Everybody ऐवजी Nobody केल्यास तुमचा लास्ट सीन हाईड होईल.

#मेसेज प्रिव्ह्यू

WhatsApp वर येणाऱ्या सर्व मेसेजचा सर्वात आधी एक स्मॉल प्रिव्ह्यू दिसतो. तो प्रिव्ह्यू नको असल्यास नोटीफिकेशन सेटिंग्समध्ये जाऊन Show Preview हा ऑप्शन ऑफ करा. नव्या वर्षात WhatsApp मध्ये पाहायला मिळतील हे नवे फीचर्स

#WhatsApp स्टेटस

24 तास दिसणारं तुमचं खास WhatsApp स्टेटस काही लोकांना दिसू नये अशी तुमची इच्छा असल्यास स्टेट्स प्रायव्हसीमध्ये जाऊन Only Share With या पर्यायावर क्लिक करा. म्हणजे तुमचे स्टेटस तुम्ही सिलेक्ट केलेले लोकचं पाहू शकतील. फोटोज whatsApp stickers मध्ये कसे कन्वर्ट कराल? 

#प्रोफाईल फोटो

तुमचा WhatsApp वरील प्रोफाईल फोटो दुसरी व्यक्ती अगदी सहज सेव्ह करु शकते. मात्र हे टाळायचे असल्यास फोटोची व्हिजिबिलीटी तुमच्या फ्रेंड्ससोबतच मर्यादीत ठेवा.

#रीड रिसीट

मेसेज खालील ब्ल्यू टीकवरुन समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे की नाही ते समजते. मात्र तुम्ही मेसेज वाचला हे कळू नये असं वाटत असेल तर रीड रिसीट टर्न ऑफ करा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ब्ल्यू टीक दिसणार नाही.