व्हॉट्सअॅप (WhatsApp)ने वेळोवेळी नवनवीन बदल करत, नवीन फीचर्स आणून वापरकर्त्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. फक्त मेसेजेसच नाही तर अनकही खूप काही गोष्टी तुम्ही व्हॉट्सअॅपवर करू शकता म्हणून आज जगातील सर्वात अव्वल मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पहिले जाते. बदलत्या वर्षात व्हॉट्सअॅपदेखील अजून काही नवे फीचर्स घेऊन येण्याच्या तयारीत आहे. 2019 मध्ये 6 नवे फीचर्स व्हॉट्सअॅपमध्ये पाहायला मिळतील. सध्या या फीचर्सची टेस्ट सुरु असून लवकरच तुमच्या पर्यंत ते पोहोचतील. चला तर पाहूया काय आहेत हे फीचर्स
व्हॉईस मेसेज
आतापर्यंत तुम्ही मेसेज टाईप करून किंवा आवाज रेकॉर्ड करून मेसेज पाठवू शकत होतात. एखादी भावना समजण्यासाठी जसा लगेच आपण ईमोजी निवडतो. तसे ऑप्शन व्हॉईस मेसेजमध्ये देखील येणार आहेत.
क्यू आर कोड
एखाद्याला नंबर सांगण्यापेक्षा फोनचा क्यू आर कोड एकमेकांशी स्कॅन केल्यावर आपले डिटेल्स शेअर होऊ शकतात. हे युजर्सच्या सेफ्टीसाठी देखील चांगले आहे. क्यू आर कोडने डेस्कटॉपवर लॉग इन करताना प्रत्येक वेळी स्कॅन कराव लागतो.
डार्क मोड
डार्क मोड मध्ये युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेण्यात आली आहे. दिवसात जास्त प्रकाशामुळे मोबाईल स्क्रिनवरचा प्रकाश कमी दिसतो. अशावेळी ब्राईटनेस वाढवावा लागतो. पण रात्री ब्राईटनेस कमी करावा लागतो. मात्र आता नव्या फीचरमुळे सर्वकाही वेळेप्रमाणे बदललेल दिसेल. यामुळे डोळ्यांनाही त्रास होणार नाही.
ग्रुप कॉल शॉर्टकट
ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल व्हॉट्सने नुकतेच आणले आहे. मात्र आता नव्या येणाऱ्या फीचरमुळे आपण ग्रुपमधील ठराविक जणांनाच व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करु शकतो.
मीडिया प्रिव्ह्यू
एखादा व्हिडीओ, फोटो किंवा ऑडीओ आला असेल तर त्याला खाली स्वाईप करुन तो नंतरही पाहू शकतो. यासाठी प्रत्येकवेळी एप ओपन करायची गरज लागणार नाही. ही सुविधा केवळ आयओएस डिव्हाइस युजर्सनाच मिळणार आहे.
पिक्चर इन पिक्चर
तुम्ही एखादी युट्यूब लिंक समोरच्याला पाठवली तर त्याच्या मोबाईलची सिस्टिम लगेच त्याला युट्यूबवर घेऊन जाईल आणि व्हिडीओ ओपन होईल.मोबाईल स्क्रिनवर तुम्हाला तो युट्यूब व्हिडीओ प्ले झालेला दिसेल. त्याचवेळी तुम्ही चॅट देखील करु शकता. यासाठी तुम्हाला वेगवेगळे टॅप करण्याची गरज नाही.