Shocking: रोबोटने व्यक्तीला चिरडून ठार मारले; समजू शकला नाही भाजीचा बॉक्स आणि जिवंत माणूस यातील फरक, जाणून घ्या सविस्तर
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

सध्या अनेक ठिकाणी विविध कामांसाठी रोबोटचा (Robot) वापर केला जातो. विविध कारखान्यांमध्ये तर हमखास रोबोट पहायला मिळतात. मात्र हे रोबोट जितके फायद्याचे आहेत तितकेच त्यांचे तोटेही आहे. नुकतेच असे एक धक्कादायक प्रकरण दक्षिण कोरियामधून (South Korea) समोर आले आहे. या ठिकाणी एका व्यक्तीला रोबोटने चिरडून ठार केल्याचा आरोप आहे. योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हे यंत्र एक व्यक्ती आणि भाजीपाला बॉक्स यामधील फरक ओळखण्यात अपयशी ठरले.

कथितरित्या रोबोटला माणूस आणि भाजीचा बॉक्स यातील फरक न समजल्याने, त्याने बॉक्सऐवजी एक माणूस उचलला आणि त्याला कन्व्हेयर बेल्टवर ढकलले. त्या ठिकाणी व्यक्तीचे डोके, चेहरा आणि छाती चिरडले गेले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती एका रोबोटिक्स कंपनीतील कर्मचारी होती आणि त्याचे वय 40 होते. तो रोबोटची तपासणी करत होता. ज्या ठिकाणी हा अपघात झाले ते, दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादनांचे वितरण केंद्र आहे.

या व्यक्तीला कंपनीकडून रोबोटचे सेन्सर ऑपरेशन तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. या ठिकाणी औद्योगिक रोबोट सिमला मिरचीचे बॉक्स उचलून पॅलेटवर ठेवत होता. त्याच वेळी, मशीनमध्ये काही बिघाड झाला आणि रोबोटने सिमला मिरचीच्या बॉक्सऐवजी या माणसाला उचलले आणि नंतर त्याचा संपूर्ण वरचा भाग कन्व्हेयर बेल्टमध्ये टाकला. घटनेनंतर कामगाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Python Bites Penis: 'गुप्तांगाला चावला साप', ऑस्ट्रेलियन पॉर्नस्टार Dani Dabello हिचा जोडीदार रक्तबंबाळ)

दक्षिण कोरियामधून समोर आलेली ही या वर्षातील दुसरी घटना आहे. या वर्षी मार्चमध्ये, दक्षिण कोरियाच्या एका माणसाला ऑटोमोबाईल पार्ट्स निर्मिती प्लांटमध्ये काम करताना रोबोटने पकडल्यामुळे गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा रोबोटच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे. कामाच्या ठिकाणी मशीन खरोखरच माणसांची जागा घेऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.