Shinco India कंपनीने Alexa सपोर्टसह भारतात लाँच केला स्मार्ट टिव्ही, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल सुखद धक्का!
Shinco India Smart TV (Photo Credits: Twitter Official)

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शिन्को इंडियाने (Shinco India) आपला नवा स्मार्टटिव्ही (Smart TV) नुकताच भारतात लाँच केला आहे. या स्मार्टटिव्हीचे स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे हा यात Alexa देखील बिल्ट इन करण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्ट टिव्ही अलेक्सा प्रमाणे आपले ऑर्डर्स फॉलो करेल. या स्मार्टटिव्ही दोन साइजमध्ये लाँच करण्यात आला आहे. एक म्हणजे 32 इंच आणि दुसरा 43 इंच. त्यामुळे या स्मार्टटिव्हीची उत्सुकता भारतीय ग्राहकांमध्ये देखील वाढली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत ऐकून तुम्हाला सुखद धक्का बसेल.

या स्मार्टटिव्हीच्या 32 इंचाच्या वेरियंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 43 इंचाच्या वेरियंटची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोन तुम्ही अॅमेजॉनच्या ग्रेट रिपब्लिक सेल मध्ये 19,999 रुपयांना खरेदी करु शकता.हेदेखील वाचा- Amazon Great Republic Day Sale: अॅमेजॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये OnePlus, Redmi सह 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय जबरदस्त सूट

पाहूयात या स्मार्टटिव्हीची स्मार्ट वैशिष्ट्ये

SO32SF 32 इंचाच्या स्मार्टटिव्हीमध्ये Alexa इनबिल्ट असून हा HD Ready डिस्प्ले पॅनलसह येतो. या स्मार्ट टिव्हीचे रिजोल्युशन 1366X768 इतके आहे. हा Android TV8 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 1GB रॅम आणि 8GB इनबिल्ट स्टोरेज देखील मिळते. कंपनीने यात MOVIEBOX अॅप दिला आहे. ज्यात तुम्ही 20 हजारांपेक्षा जास्त चित्रपट 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये स्ट्रीम केले जाऊ शकतात. यात Disney+ Hotstar, Sonyliv, Zee5, Voot सारखे प्री-इन्स्टॉल्ड अॅप्स सुद्धा येतात.

SO43AS 43 इंचाच्या स्मार्टटिव्हीमध्ये 32 इंचाच्या टिव्हीप्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत. फक्त यात डिस्प्ले रिजोल्यूशन 1920X1080 इतके आहे. हा सुद्धा A-35 क्वाड कोर प्रोसेसर, Android TV 8.0 ऑपरेटिंग सिस्टम आणि Alexa वॉयस कमांड फीचरसह येतो. तसेच यातही 20W चे इन-बिल्ट स्पीकर दिले गेले आहेत जे स्टीरियो साउंडला सपोर्ट करतात.