Amazon Great Republic Day Sale: अॅमेजॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये OnePlus, Redmi सह 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय जबरदस्त सूट
या ऑनलाईन सेलमध्ये Apple, OnePlus, Redmi, Samsung च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. मात्र या कंपनींच्या काही ठराविक फोन्सवरच ही सूट मिळणार आहे.
रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सर्व ऑनलाईन शॉपिंग साइटवर जबरदस्त सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या स्मार्टफोन्सवर, गॅजेक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉनवर (Amazon India) देखील सेल सुरु होतोय. अॅमेजॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) येत्या 20 जानेवारीपासून ते 23 जानेवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये SBI च्या क्रेडिट कार्डधारकांना 10% चा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. तर ICICI कार्डधारकांना नो कॉस्ट EMI सह अनेक ऑफर्स दिली जाणार आहे.
या ऑनलाईन सेलमध्ये Apple, OnePlus, Redmi, Samsung च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. मात्र या कंपनींच्या काही ठराविक फोन्सवरच ही सूट मिळणार आहे.
1. Samsung Galaxy M51
64MP चा क्वाड रियर कॅमेरा आणि 7000mAh ची बॅटरी असलेल्या या स्मार्टफोन्सवर 6000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे 6GB RAM+128GB Storage ची किंमत 22,999 रुपये आणि 8GB RAM+128GB Storage ची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
2. OnePlus 8 Series 5G
या स्मार्टफोनच्या 8GB RAM+128GB Storage ची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB RAM+256GB Storage ची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
3. Redmi Note 9 Pro Max
या स्मार्टफोनवर 3000 चा डिस्काउंट मिळत आहे. यामुळे 6GB RAM+64GB Storage ची किंमत 15,999 रुपये आणि 6GB RAM+128GB Storage ची किंमत 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Oppo A93 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
4. OPPO A31
यात ट्रिपल लेयर कॅमेरा देण्यात आला असून याच्या 4GB वेरियंटची किंमत 12,490 रुपये ठेवण्यात आली आहे.
5. Nokia 5.3
यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 12,498 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
6. Apple iPhone 7 (32GB) - Black
4.7-इंच रेटिना डिस्प्ले एचडी एलसीडी डिस्प्ले असलेल्या या आयफोनची किंमत 23,989 रुपये ठेवण्यात आली आहे. यावर 5,911 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
7. Honor 9A (Phantom Blue, 3GB RAM, 64GB Storage)
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून याची किंमत 9,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यावर 2000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.
थोडक्यात अॅमेजॉनच्या या रिपब्लिक डे सेलमध्ये खूप जबरदस्त ऑफर्स मिळत असून यामध्ये तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन खरेदी करु शकता आणि ते आकर्षक डिस्काउंट सह.
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2021 04:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

