जुना स्मार्टफोन विकताय ? येथे मिळेल योग्य किंमत !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

बाजारात सातत्याने नवनवे स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. त्यामुळे युजर्सचा जुना स्मार्टफोन विकून नवा घेण्याचा ट्रेंड सध्या आहे. याचे प्रमाणही अलिकडे वाढलेले दिसते. त्यामुळे ई कॉमर्स साईट्सवर नवे स्मार्टफोन्स खरेदीवर एक्चेंज ऑफर्स देखील मिळत आहेत. मात्र अनेकदा जून्या स्मार्टफोन्सला योग्य ती किंमत मिळत नाही. म्हणूनच स्मार्टफोन विकण्याचे हे काही पर्याय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

या साईटवर मिळेल चांगली किंमत

Atterobay.com या वेबसाईटवर तुम्ही तुमचा जूना फोन विकू शकता. यासाठी तुम्हाला या साईटवर लॉग इन करुन स्मार्टफोनबद्दलची माहिती द्यावी लगाले. उदा. फोन किती जूना आहे, फोनची सध्याची स्थिती, इत्यादी. तुमच्या फोनची सर्व माहिती मिळाल्यावर कंपनी तुम्हाला प्रोटेक्टिव्ह पॅकेजिंग पाठवले. या प्रोटेक्टिव्ह पॅकेजिंगमध्ये फोन पॅक करुन पाठवा. तुमच्याकडून माहिती घेतल्यानंतर कंपनी त्यांच्याकडून फोनची तपासणी करेल. सर्व ठीक असल्यास कंपनी डिल करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल. कंपनी युजरला चेक पाठवेल किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करेल.

या अॅपवर विकू शकता जूना स्मार्टफोन

Cashify app या अॅपच्या माध्यामातूनही तुम्ही तुमचा जूना स्मार्टफोन विकू शकता. फक्त फोनचं नाही तर वॉशिंग मशीन, लॅपटॉप यांसारख्या वस्तूही तुम्ही अॅपद्वारे विकू शकता. त्यासाठी

Cashify app हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलची सध्याच्या स्थितीबद्दल माहिती द्या. स्मार्टफोनचा स्पीकर आणि टच रिस्पॉन्स पाहून कंपनी मोबाईल चेक करेल. त्याचबरोबर कॅमेरा, स्क्रीन आणि पिक्सलही तपासण्यात येतील. त्यानंतर कंपनीकडून फोन पिकअप करण्यात येतील आणि त्याच वेळेस फोनची किंमत तुम्हाला देण्यात येईल.