इस्त्रो (ISRO) कडून आज (27 नोव्हेंबर) अवकाशातून पृथ्वीची छायाचित्र टिपण्यासाठी सॅटलाईट कार्टोसेट 3 (Cartosat-3) आणि अमेरिकेच्या 13 कमर्शियल नॅनो सॅटलाईट्ला पीएसएलवी सी 47 (PSLV-C47)ला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर शार येथून लॉन्च करण्यात आले आहे. पीएसएलव्ही सी 47 आज सकाळी 9.28 च्या दरम्यान कार्टोसेट 3 आणि 13 कमर्शिअल नॅनो सॅटेलाईटसह झेपावले आहे. त्याची उलटी गणती मंगळवार सकाळी 7.28 वाजता सुरू करण्यात आली आहे.
इस्त्रो द्वारा करण्यात आलेल्या ट्वीटनुसार, पीएसएलव्ही सी 47 एक्सएल कॉन्फ्रिगेशन मध्ये पीएसएलव्ही चे हे 21 वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा स्थित एसडीएससी शार द्वारा 74 व्या प्रक्षेपण यानाचे हे मिशन आहे. अखेर Chandrayaan 2 मोहिमेच्या अपयशाचे कारण आले समोर; ISRO ने मान्य केली 'ही' चूक.
ANI Tweet
#ISRO Chief Dr. K Sivan: I am happy that PSLV-C47 injected precisely in the orbit with 13 other satellites. Cartosat-3 is highest resolution civilian satellite; We have 13 missions up to March- 6 large vehicle missions and 7 satellite missions. pic.twitter.com/18bZ9UFhQm
— ANI (@ANI) November 27, 2019
कार्टोसेट 3 सॅटलाईट द्वारा उच्च दर्जाचे फोटो घेतले आहेत.509 किमी उंचावर कक्षेमध्ये 97.5 डिग्री वर स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान कार्टोसेट 3 च्या उड्डाणापूर्वी तिरूपतीमधील तिरूमाला मंदिरात पूजा-अर्चना केली आहे. सिवन यांनी तिरूपतीच्या तिरूमाला मध्ये भगवान व्यंकटेश मध्ये पूजा अर्चना केली आहे.