Penumbral Lunar Eclipse 2020 आज कधी दिसणार आणि यापूढील चंद्रग्रहण कुठे आणि कधी दिसणार
Partial lunar eclipse (Photo Credits: Twitter)

आज रात्री दिसणारे चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse ) हे या वर्षातील एक महत्त्वाची घटना आहे. या वर्षात दिसणारे हे दुसरे चंद्र ग्रहण आहे. आज (5 जून) मध्यरात्रीनंतर हे चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्र ग्रहणास Penumbral Lunar Eclipse असही म्हटले जाते. ग्रहण काळात चंद्राचा पृष्ठभाग पृथ्वीच्या सावलीत झाकोळला जातो. तुम्हालाही हे चंद्रग्रहण पाहायचे असेल तर तुम्हीही ही संधी दवडू नका. पण जरीही तुमची ही संधी दवडली गेली तरी नाराजही होऊ नका. कारण, असेच चंद्रग्रहण पुन्हा एकदा लगेचच पुढच्या महिन्यात दिसणार आहे. जुलै महिन्याच्या 5 तारखेला अशाच प्रकारचे तंद्रग्रहण पुन्हा एकदा दिसणार आहे.

सूर्य, पृथ्वी आणि पूर्ण चंद्र जवळजवळ असले तरी पूर्णपणे संरेखित नसतात तेव्हा पेनंब्रल चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) होते. आज चंद्र काही काळ ग्रहांच्या सावलीत जाईल, ज्यास पेनंब्रा म्हणून संबोधले जाते. आज रात्री दिसरणारा चंद्र हा पौर्णिमेला दिसणारा Strawberry Moon आहे. (हेही वाचा, Strawberry Moon Eclipse 2020: आज रात्री लागणाऱ्या चंद्रग्रहणाला 'या' कारणामुळे 'Strawberry Moon' म्हटले जाते)

शुक्रवारी 5 जून 2020 या दिवशी रात्री 11.15 मनिटांनी सुरु झालेले हे चंद्र ग्रहण 6 जून 2.32AM ला समाप्त होईल. तर रात्री 12 वाजून 54 मनिटांनी ग्रहण आपल्या पूर्ण प्रभाव काळात असेन. ग्रहण काळ तीन तासांहूनही अधिक कालावधीसाठी राहू शकेल.

पुढील Penumbral चंद्रग्रहण 4 आणि 5 जुलै रोजी दिसरणार आहे. हे चंद्रग्रहण उत्तर, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या बर्‍याच भागांमध्ये दिसू शकेल. तसेच ते 03:07 UT ते 05:52 UT पर्यंत दिसेल. भारतात मात्र हे चंद्रग्रहण दिसू शकणार नाही.