गेले कित्येक वर्षांपासून अवकाशात काही अनोळखी वस्तू उडताना दिसतात. पण पृथ्वी (Earth) वासियांसाठी मात्र उडणाऱ्या या वस्तु कायमचं एक रहस्य आहे. अवकाशात उडणाऱ्या या अनोळखी वस्तु बशीच्या (Saucer) आकाराच्या आहेत. गेले कित्येक वर्षांपासून याबाबतचा शोध जगभरात सुरु आहे पण नेमका काय तो निष्कर्ष अजूनही पुढे आला नाही. किंवा यासंबंधीत कुठलही संशोधन पुढे आलं नाही. या संबंधीत सखोल संशोधन आता नासा करणार आहे. यासाठी नासाकडून 16 जणांची टीम साकारत जी शेकडो वर्षांपासून रहस्यमय असणाऱ्या एलियन्स (aliens) आणि अवकाशात दिसणाऱ्या अनोळखी वस्तूंचं संशोधन करणार आहे. तरी या टीमकडून याबाबत संशोधनाला (research) सुरुवात झाली असुन याबाबतची लवकरचं अपडेट (Update) पुढे आणू असं नासा (NASA) कडून सांगण्यात आलं आहे.
याबाबत ट्वीट (Tweet) करत नासाने (NASA) महत्वपूर्ण माहिती दिली आहे. “आम्ही अनोळखी हवाई घटना (UAP) किंवा विमान म्हणून ओळखल्या जाऊ शकत नसलेल्या किंवा नैसर्गिक घटना म्हणून ओळखल्या जाऊ शकत नाहीत अशा आकाशातील निरीक्षणांवर स्वतंत्र अभ्यास पथकात सहभागी होण्यासाठी 16 व्यक्तींची निवड केली आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच हे संशोधन कार्य पुढील नऊ महिने चालणार असुन या संशोधनाची सुरुवात उद्यापासून म्हणजे 24 ऑक्टोबरपासून (October) करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- ISRO Satellite Launched: दिवाळीच्या मुहूर्तावर 'LVM-3' चे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण, पहा व्हिडीओ)
We’ve selected 16 individuals to participate in an independent study team on unidentified aerial phenomena (UAP), or observations in the sky that cannot be identified as aircraft or known natural phenomena. The nine-month study will begin on Oct. 24: https://t.co/RsVP4kggwd pic.twitter.com/OQ5XecW0Ai
— NASA (@NASA) October 21, 2022
गेले काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या (America) एका उच्च संरक्षण अधिकार्याने सांगितले की, गेल्या 20 वर्षांत आकाशात अज्ञात उडणाऱ्या वस्तूंची संख्या वाढली आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून आम्ही लष्करी-नियंत्रित प्रशिक्षण क्षेत्रे आणि प्रशिक्षण श्रेणी आणि इतर नियुक्त हवाई क्षेत्रात अनधिकृत आणि अज्ञात विमाने किंवा वस्तूंची वाढती संख्या पाहिली आहे. त्यामुळे या अनोखी उडणाऱ्या वस्तू काय हे गूढ सोडवणं आवश्यक आहे.