International Space Station चं आज राजकोट, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली मधून होणार दर्शन; इथे पहा वेळ!
ISS | Photo Used for Representational Purpose| Photo Credits: Pixabay.com

International Space Station हे अवकाशामध्ये चंद्र आणि सूर्यानंतर प्रकाशित आणि थेट डोळ्यांनी पाहता येऊ शकतं असं एक ऑब्जेक्ट आहे. मात्र हे पाहण्यासाठी आकाश निरभ्र असणं आणि वेळ या दोन गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. दरम्यान सूर्यास्त किंवा सूर्योदयापूर्वी त्याची झलक पाहता येते. दरम्यान भारतामध्येही आज (14 जुलै) पाहता येणार आहे. राजकोट, अहमदाबाद या गुजरात मधील शहरांमध्ये तर राजस्थानमधील जयपूर आणि दिल्ली मध्येही हे पाहता येणार आहे.

भारतामधील या शहरांमध्ये आज रात्री अभाळात सुमारे 90 डिग्री अंशामध्ये हे पाहता येणार आहे. दरम्यान आज हे International Space Station अहमदाबाद मध्ये रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी पाहता येईल. तर जयपूर आणि दिल्लीमध्ये सुमारे 8 वाजून 37 मिनिटांनी त्याचे दर्शन होईल. अवकाशातील हे अदभूत दृश्य अवघ्या 6 मिनिटांसाठी दिसणार आहे.

तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून उभे असाल तर दक्षिणेच्या क्षितीजावरून उत्तरेकडे एका तार्‍याप्रमाणे जाताना दिसणार आहे.

दरम्यान वर सांगितलेल्या शहरात 80 किमीच्या परिसरात International Space Station चं दर्शन होणार आहे. यासोबतच वडोदरा, इंदोर, आग्रा, देहरादून, चंदिगढ येथे देखील त्याच दर्शन होणार आहे. मात्र ते थेट डोक्यावर नसेल. त्याला एका विशिष्ट दिशेत पाहता येईल.

Spot The Station या अधिकृत वेबसाईटवर तुम्हांला त्याचं ट्रॅकिंग पाहता येणार आहे. त्यामुळे तुमच्या शहरामध्ये येत्या आठवड्यात कधी पाहता येईल स्पेस स्टेशन हे जाणून घेण्यासाठी त्याला नक्की भेट द्या.