Chandrayaan-2 Updates: चांद्रयान 2 चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश; ISRO ने दिली माहिती
Chandrayaan-2 Launch (Photo Credits: Twitter, @isro)

Chandrayaan-2 Updates:  चांद्रयान 2 अखेर चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले आहे. भारतीय आंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थातच इस्त्रो (ISRO) च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करुन ही माहिती दिली. आज (बुधवार, 28 ऑगस्ट 2019) सकाळी 9 वाजता हे यान यशस्वीरित्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले. चांद्रयान 2 हे हळूहळू आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचत आहे. हे यान विविध टप्पे पार करत चंद्रावर पोहोचत आहे.

दरम्यन, चांद्रयान 2 चंद्रावर अद्याप पोहोचले नाही. तर, ते विविध कक्षा भेदत चंद्रापर्यंत हळूहळू  पोहोचत आहे. चांद्रयान 2 चा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत उत्तम रित्या पार पडत आहे. अडचणी येत आहेत. मात्र, त्या योग्य वेळी दूर करण्यात येत आहेत. चांद्रयान 2 हे चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पाठविण्यासाठी त्यात काही बदल करण्यात आले होते.

चांद्रयान 2 ने 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. दुसऱ्या कक्षेत पोहोचताच चांद्रयान 2 ने चंद्राची छायाचित्रे पृथ्वीवर (भारताकडे) पाठविण्यास सुरुवात केली होती. चांद्रयान 2 ने पाठवलेल्या चंद्राच्या फोटोमध्ये अनेक क्रेटर्स पाहायला मिळाले होते. (हेही वाचा, Chandrayaan 2 ने पाठवल्या चंद्राच्या पृष्ठभागावरील Craters च्या प्रतिमा; चंद्रावरीलवरील खड्डे पाहून व्हाल आश्चर्यचकित)

एएनआय ट्विट

चांद्रयान 2 यशस्वी लॉन्च केल्यानंतर त्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. जेणेकरुन चांद्रयान 2 हे यशस्वीपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. इस्त्रोचा प्रयत्न असले तरी, 2 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चे विक्रम लॅंडर चद्रावर यशस्वीरित्या उतरने जाईल. विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या इतरने हे एक मोठे यश इस्त्रो आणि भारतासाठी असणार आहे.