जगातील अग्रगण्य सर्च इंजिन गूगल (Google) आज भारतीय प्रोफेसर आणि शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव (Udupi Ramachandra Rao) अर्थात यू.आर. राव यांची 89 वी जयंती साजरी करत आहे. या निमित्ताने गूगलच्या होमपेजवर आज खास गूगल डुडल (Google Doodle) देखील झळकले आहे. भारताचे सॅटेलाईट मॅन (India's Satellite Man) अशी राव यांची ओळख होती. त्यांचे निधन 2017 साली झाले. राव हे ISRO चे चेअरमॅन होते.
आज यू आर राव यांच्या जयंती निमित्तच्या गूगल डुडलमध्ये त्यांचे स्केचच्या मागे पृथ्वी आणि अॅनिमेटेड शुटिंग स्टार्स दिसत आहेत. गूगलने नुकताच जागतिक महिला दिना निमित्त देखील खास गूगल डुडल शेअर करत स्त्री शक्तीला सलाम केला होता.
कर्नाटकमधील एका लहानशा गावामध्ये 1932 साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या करियरची सुरूवात कॉस्मिक रे फिजिस्ट म्हणून झाली. राव यांनी डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेमध्ये आले त्यांनी नासा मध्ये काम करण्यास सुरूवात केली. नंतर 1966 मध्ये त्यांनी भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 1975 साली राव यांच्या नेतृत्त्वाखालीच भारताने आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' अवकाशामध्ये सोडला.
Udupi Ramachandra Rao यांना 1976 साली पद्मभूषण तर 2017 साली पद्मविभूषण हे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच अंतराक्ष क्षेत्रात काम करणारे आणि 'सॅटेलाईट हॉल ऑफ द फेम' , 'आयएएफ हॉल ऑफ द फेम' या पुरस्काराने गौरवले जाणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.