International Women's Day 2021 Doodle (Photo Credits: YouTube)

जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women's Day 2021) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गुगलने (Google) तमाम नारीचा सन्मान करण्यासाठी डुडलच्या (Doodle) माध्यमातून एका अनोख्या पद्धतीने स्त्री शक्तीला सलाम केला आहे. गुगल व्हिडिओद्वारे एक खास डुडल बनवले आहे. ज्यात अॅनिमेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दाखवल्या आहेत. यात विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मिडिया यांसारख्या निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे.

गुगल ने महिला दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे. यात महिलांचे केवळ हात दिसत आहे. मात्र त्यावर त्या कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ते कळत आहे. त्यानंतर या सा-या महिला आपले हात उंचावून एकमेकांचे हात घट्ट पकडलेले दिसत आहे.हेदेखील वाचा- Happy Women's Day Wishes in Marathi: जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे नारी शक्तीचा करा सन्मान!

पाहा व्हिडिओ:

या डूडलमध्ये महिलांच्या हातांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात महिलांचे पहिले मतदान, विज्ञान क्षेत्रातील काम, लेखिका, प्रवक्त्या, निवेदिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असताना दिसत आहे.

आज जगात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला कार्यरत नाही. पूर्वीच्या काळी जिथे महिलांना घराबाहेर पडणे देखील वर्ज्य होते तिथेच आज काळानुसार बदलेल्या महिला घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करत आहे. जेथे महिलांनी स्वत:चे असे अढळ स्थान निर्माण केले आहे. अशा महिलांना गुगलने डुडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.