IAF Group Captain Shubhanshu Shukla | X@ANI

अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Astronaut Shubhanshu Shukla) 18 दिवस अंतराळ राहिल्यानंतर आता पृथ्वीवर परतणार आहे. 15 जुलै दिवशी अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया मध्ये त्याचे स्पॅशडाऊन होणार आहे. शुभांशू सोबत अजून 3 अंतराळवीर आहेत. यामध्ये Peggy Whitson, Slawosz Uznanski-Wisniewski आणि Tibor Kapu यांचा समावेश आहे. Commercial अंतर्गत हे सारे 26 जून दिवशी अवकाशामध्ये ISS मध्ये काही प्रयोग आणि महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी गेले होते.

14 जुलै दिवशी भारतीय वेळ संध्याकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. ISRO,च्या माहितीनुसार कॅलिफॉर्निया च्या समुद्रावर त्यांचे 15 जुलैला दुपारी 3 च्या सुमारास लॅन्डिग होणार आहे. पृथ्वीवर पतरल्यानंतर त्यांना 7 दिवसांच्या रिहॅब मध्ये ठेवले जाणार आहे. शुभांशू शुक्लाची तब्येत उत्तम स्थितीमध्ये आहे. सध्या त्यांच्या आरोग्यावर विशेष टीम लक्ष ठेवून आहे. मात्र 18 दिवस अंतराळामध्ये राहिल्यानंतर पृथ्वीवर पुन्हा गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी आता विशेष निगराणीखाली ठेवले जाणार आहे.

शुभांशू शुक्ला हे ISS मध्ये प्रवास करणारे, शून्य गुरुत्वाकर्षणात राहणारे आणि काम करणारे पहिले भारतीय बनले आहेत. त्यांच्या आधी विंग कमांडर राकेश शर्मा 1984  मध्ये अंतराळात गेले होते. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी सूक्ष्म शैवाल प्रयोगावर काम केले, त्यांनी असे नमुने तैनात केले आणि साठवले जे एके दिवशी खोल अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैवइंधन प्रदान करू शकतील.