Asteroids Representational Image (Photo Credits: Pixabay)

यंदाचं 2020 हे वर्ष संपण्याआधी पुन्हा एकदा पृथ्वी जवळून asteroid जाणार असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. 29 नोव्हेंबर रविवारी,  2000 WO107 नावाचं asteroid हे 56,000mph या वेगाने जाईल. तसेच त्याचा व्यास 0.51 किमी असेल. तर उंची ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग दुबईच्या Burj Khalifa इतकी असेल अशी माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने त्याचा पृथ्वीला धोका नसेल. हे asteroid पृथ्वीपासून 4,302,775 km अंतरावरून जाणार आहे. हे अंतर म्हणजे चंद्र अअणि पृथ्वी मधील अंदाजे 11 वेळा जितकं अंतर असू शकतं तितकं असल्याचं सांगितलं जात आहे.

NASA या अमेरिकेच्या संस्थेने asteroid बद्दल अधिक माहिती देताना ते 12,00 फीट ते 2,5700 फीट म्हणजेच 370m ते 820m इतक्या आकाराचं असू शकतं असं म्हटलं आहे. रविवार म्हणजे 29 नोव्हेंबरच्या रात्री 3 वाजून30 मिनिटांनी ते पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हे asteroid, New Mexico चे शास्त्रज्ञ 2000 सालपासून शोधत असेल. (नक्की वाचा: Asteroid 2020ND: पृथ्वी जवळून जाणार London Eye पेक्षाही दीडपट मोठा लघुग्रह; नासा ने दिला इशारा).

दरम्यान नासाच्या माहितीनुसार, asteroids हे एअरलेस आणि रॉकी म्हणजेच खडकाळ आणि हवा नसलेले असे भाग असतात जे सोलर सिस्टीम बनतात उरलेले आहेत. साधारणपने 4.6 बिलियन वर्षांपूर्वी सौर मंडळ बनलं आहे. अंदाजे अशाप्रकारे आतापर्यंत 1,031,488 asteroid आहेत. पृथ्वीपासून एका विशिष्ट अंतरावरून ते जाणं सुरक्षित आहे. त्यांच्या प्रवासावर सातत्याने शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. दिलासादायक बाब म्हणून अद्याप एकाही asteroid च्या प्रवासाचा पृथ्वीला फटका बसलेला नाही.