सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर - संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) आणि विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यांच्यात सध्या व्हिडीओ वॉर (Video War) हा सुरु आहे. दोघांचे चाहतेही एकमेकांवर भरपूर कमेंट करत आहेत. या दोन मोटिवेशनल स्पीकर्समध्ये काय घडले याची चर्चा यूट्यूबपासून X पर्यंत केली जात आहे. युट्युबर (Youtuber) आणि मोटिवेशनल स्पीकर (Motivational Speakers) संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात मोठा घोटाळा उघड झाल्याचा दावा करण्यात आला. माहेश्वरी यांनी कोणाचेही नाव न घेता एका स्कॅमचा उल्लेख केला. या व्हिडिओनंतर या वादाला सुरुवात झाली. (हेही वाचा - Boy Accidentally Hangs Himself Mimicking YouTube Reel: व्हिडिओ बनविण्याच्या नादात चुकून गळफास, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)
व्हिडिओ पब्लिश झाल्याच्या काही दिवसांनी विवेक बिंद्रा यांनी यावर आक्षेप घेतला. व्हिडिओत माहेश्वरी यांनी बिंद्रा यांचा बिझनेस मॉडेल कशाप्रकारे स्कॅम असल्याचे आपल्या प्रेक्षकांना पटवून सांगितले. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या डॉक्टरेटबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि काही मुलांचे व्हिडिओज देखील दाखवले आहेत.
विवेक बिंद्रा एक मोटीवेशनल स्पीकर आणि बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. माहेश्वरी यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यापासून बिंद्रा आणि संदीप यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेले नसून संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून विवेक बिंद्राच्या तीन चुकांची यादी सामायिक केली.